जिल्ह्यात लसीकरणाची गाडी पुन्हा सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:32 AM2021-08-19T04:32:42+5:302021-08-19T04:32:42+5:30

गोंदिया : कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे तसेच सिरींजचा तुटवडा यामुळे घसरलेली लसीकरणाची आकडेवारी मंगळवारी पुन्हा वधारली आहे. मंगळवारी ...

Vaccination drive in the district again | जिल्ह्यात लसीकरणाची गाडी पुन्हा सुसाट

जिल्ह्यात लसीकरणाची गाडी पुन्हा सुसाट

Next

गोंदिया : कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे तसेच सिरींजचा तुटवडा यामुळे घसरलेली लसीकरणाची आकडेवारी मंगळवारी पुन्हा वधारली आहे. मंगळवारी जिल्ह्यात तब्बल १५९५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यासाठी लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे. एकंदर लसीकरणाला घेऊन आरोग्य विभागाने पुन्हा एकदा कंबर कसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात लसीकरणाची गाडी पुन्हा सुसाट धावत असल्याचे दिसत आहे.

लसीकरणात जिल्हा राज्यात अग्रेसर होता व आतापर्यंत जिल्ह्याने ५० टक्के लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. मात्र, मध्यंतरी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने लसीकरण केंद्रांची संख्या झपाट्याने कमी करण्यात आली. त्यानंतर मोजक्याच केंद्रांवर लसीकरण सुरू होते. शिवाय सध्या लसींचा नियमित पुरवठा होत असतानाच सिरिंजचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळेही लसीकरणाची आकडेवारी घसरत चालली होती. विशेष म्हणजे, सोमवारी जिल्ह्यात फक्त ६५० नागरिकांच्या लसीकरणाची नोंद घेण्यात आली आहे.

मात्र मंगळवारी (दि.१७) सिरिंज व लस दोन्हींचे जिल्ह्यात वितरण करण्यात आले तसेच लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आल्याने तब्बल १५९५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे आता आरोग्य विभागाने लसीकरणाला घेऊन कंबर कसल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, लसीकरणाची गाडी पुन्हा रूळावर आली आहे असेच असल्यास जिल्हा लवकरच १०० टक्के लसीकरण झालेला राज्यातील पहिला जिल्हा ठरणार यात शंका नाही.

-----------------------------

आता १४० केंद्रांवर लसीकरण

जिल्ह्यात शनिवारपर्यंत फक्त २५ केंद्रांवरच लसीकरण करण्यात येत होते. परिणामी नागरिकांची लसीकरणाला घेऊन धावपळ होत होती. परिणामी नागरिकांनी लसीकरण टाळले व आकडेवारी घटली होती. मात्र, आरोग्य विभागाने बुधवारपासून केंद्र वाढविले असून आता १४० केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. परिणामी नागरिकांना लसीकरण पुन्हा सोयीचे होणार असून आकडेवारीही वाढणार यात शंका नाही.

----------------------------

आज मिळणार ४०००० सिरींज

जिल्ह्यात लसींचा पुरवठा नियमित होत असल्याने मोठ्या प्रमाणात लसींचा साठा होता. मात्र, सिरिंज नसल्याने लसीकरणात अडचण येत होती. त्यात मंगळवारी २५२०० सिरिंज जिल्ह्याला मिळाल्या होत्या. मात्र, एवढ्याने होणार नसल्याने आणखी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी आणखी ४०००० सिरिंज मिळणार आहेत. यामुळे सिरिंजचा तुटवडा जाणवणार नाही.

Web Title: Vaccination drive in the district again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.