मागास भागातही पोहोचली लसीकरण चळ‌वळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:20 AM2021-06-19T04:20:23+5:302021-06-19T04:20:23+5:30

गोंदिया : आतापर्यंत शहरी भागात लसीकरणाची आकडेवारी वधारत असतानाच ग्रामीण भागात लसीकरणाप्रती उदासीनता दिसून येत होती. मात्र, आता लसीकरणाची ...

Vaccination movement also reached backward areas | मागास भागातही पोहोचली लसीकरण चळ‌वळ

मागास भागातही पोहोचली लसीकरण चळ‌वळ

Next

गोंदिया : आतापर्यंत शहरी भागात लसीकरणाची आकडेवारी वधारत असतानाच ग्रामीण भागात लसीकरणाप्रती उदासीनता दिसून येत होती. मात्र, आता लसीकरणाची ही चळवळ आदिवासीबहुल व मागास भागांतही पोहोचत असल्याचे सत्कारात्मक चित्र जिल्ह्यात उमटत आहे. कारण, गुरुवारी (दि.१७) जिल्ह्यातील देवरी व सडक-अर्जुनी तालुक्याने तब्बल १,००० हून अधिक नागरिकांचे लसीकरण करीत उत्कृष्ट कामगिरी केल्याचे दिसून आले.

लसीकरणाला घेऊन आजही नागरिकांमध्ये काही शंका व भ्रम घर करून बसले आहेत. परिणामी, जिल्ह्यात ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करूनही पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण होत नसल्याचे दिसत आहे. परिणामी, प्रशासनाला आता लोकांच्या मनातील ही भीती बाहेर काढण्यासाठी जनजागृती करावी लागत आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार फक्त वयोवृद्ध व अशिक्षितांमध्ये नसून तरुण व चांगले शिक्षितही लसीला घेऊन भ्रम बाळगून आहेत. तरीही शहरी भागात लसीकरण चांगल्या प्रमाणात होत असतानाच ग्रामीण भागात मात्र लसीकरणासाठी त्रास होत आहे.

असे असतानाच आता जिल्हावासीयांसाठी चांगली बातमी असून, जिल्ह्यातील आदिवासीबहुल व मागास क्षेत्रात मोडणाऱ्या देवरी तालुक्यात गुरुवारी (दि.१७) तब्बल १,००८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर सडक-अर्जुनी तालुक्यात १,४९४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. या तालुक्यांची ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी असावी. मात्र, आता या तालुक्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले असून, अन्य तालुक्यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. यानंतर मात्र आता लसीकरणाची चळवळ ग्रामीण भागातही पोहोचत असल्याचे दिसून आले.

---------------------------------

आमगाव तालुका सर्वांत सुस्त

एकीकडे आदिवासीबहुल व मागास तालुक्यांत जोमात लसीकरण सुरू आहे. तेथेच मात्र आमगाव तालुक्यात सर्वांत कमी लसीकरण गुरुवारी झाल्याचे दिसून आले. आमगाव तालुक्यात सर्वांत कमी फक्त ४५५ नागरिकांना लस देण्यात आल्याचे दिसून येत आहे. यावरून आता आमगाव तालुका सर्वांत सुस्त दिसून येत असून, तालुक्यालाच लसीकरणाचा डोस देण्याची गरज दिसून येत आहे.

--------------------------------

लसीकरणाचा गुरुवारचा तालुकानिहाय तक्ता

तालुका केंद्र लसीकरण

गोंदिया १० १,०७३

आमगाव ०५ ४५५

तिरोडा ०४ ८९२

गोरेगाव ०६ ७७६

सालेकसा ०५ ६६२

देवरी ०६ १,००८

सडक-अर्जुनी ०५ १,४९४

अर्जुनी-मोरगाव ०८ ८३०

एकूण ४९ ७,१९०

Web Title: Vaccination movement also reached backward areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.