अर्बन केंद्रात लसीकरण प्रशिक्षण कार्यशाळा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:18 AM2021-07-22T04:18:59+5:302021-07-22T04:18:59+5:30
उदघाटन केटीएस जिल्हा रूग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी ...
उदघाटन केटीएस जिल्हा रूग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. हुबेकर यांनी, अलीकडेच लाँच झालेल्या न्यूमोकोकल लसीबाबत शास्त्रोक्त माहीती परिचारिकांना दिली. ६ आठवडे व १४ आठवडे आणि बुस्टर डोस ९ महिने असे ३ डोस नवजात बाळांना लावून त्याना १ वर्षाच्या आत संपूर्ण लसीकरणाने सुरक्षित करायचे आहे. शहरात अशा एकूण १९८० बालकांना मोफत न्युमोकोकल लस द्यायची आहे असे सांगीतले. तसेच सध्या सुरू असलेल्या क्षार जलसंजीवणी पंधरवडाबाबत आरोग्य सेविका व आशा वर्कर्सला माहिती दिली. शिवाय, आजारी बालकांना मोफत ओआरएस पाकिटे वाटण्याबाबत व बाह्य रुग्ण विभागात ओआरटी कॉर्नर तयार करण्यासाठी सूचना दिल्या. तसेच झिंकच्या गोळ्यांचे उपचार अतिसार झालेल्या बालकांना देण्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आशांना समजावून सांगितली. यावेळी अर्बन सेंटरचे शैलेश टेभुर्णे, पारधी आणि पॅरामेडीकल स्टाफ उपस्थित होते.