वैष्णवीने घरोघरी जाऊन केली विविध विषयांवर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:49+5:302021-07-16T04:20:49+5:30
वैष्णवी बीएसडब्ल्यू भाग-३ ची विद्यार्थिनी असून तिने पंचायत राज सक्षमीकरणाव्दारे गावातील लोकांचे मूलभूत अधिकार व त्या अनुषंगाने स्थानिक संस्थांद्वारे ...
वैष्णवी बीएसडब्ल्यू भाग-३ ची विद्यार्थिनी असून तिने पंचायत राज सक्षमीकरणाव्दारे गावातील लोकांचे मूलभूत अधिकार व त्या अनुषंगाने स्थानिक संस्थांद्वारे लोकांसाठी केलेल्या सुविधा जाणून घेतल्या. असंवेदनशीलतेची जाणीव ठेवून सैनिक आरोग्य सेवेसाठी जनतेने पुढे यावे याची जाणीव ग्रामस्थांना करून दिली. तसेच पंचायतराज सक्षमीकरण अंतर्गत केलेल्या कामांची माहिती ग्राम विकास अधिकारी विनोद श्रीवास्तव, तलाठी निमकर, अंगणवाडी सेविका आरोग्यवर्धिनी केंद्रामधून घेऊन या योजनांची माहिती प्रत्यक्षात घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहचविली. कोरोना काळात संवेदनशीलतेची जाणीव ठेऊन आपले बँकिंग व इतर व्यवहार ऑनलाइन होत आहेत याची जाण सर्वांनी घ्यावी, शैक्षणिक विकासाकडे लक्ष द्यावे, आरोग्याची शासकीय यंत्रणेद्वारे तपासणी करावी व आदिवासी मुलांमध्ये शैक्षणिक सामाजिक स्तर सुधारण्याचा प्रयत्न करावा, असे क्षेत्र कार्याच्या माध्यमातून वैष्णवीने लोकांना समजावून दिले.