शिक्षकांची शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 09:28 PM2019-08-20T21:28:14+5:302019-08-20T21:28:55+5:30
वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाला मंगळवारी (दि.२०) हिंसक वळण आले. आंदोलनातील शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वेतनाच्या मागणीला घेऊन आंदोलन करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाला मंगळवारी (दि.२०) हिंसक वळण आले. आंदोलनातील शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या कार्यालयात तोडफोड केली. प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात घेत ग्रामीण पोलिसांनी आंदोलक शिक्षकांना ताब्यात घेतले.
१२ वा दिवस असूनही अद्याप शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यातच आम्हाला शाळेत शिक्षक नाहीत कसे करायचे हे विचारायला आलेल्या विद्यार्थ्यांनाच शिक्षणाधिकाऱ्यांनी (माध्यमिक) विनाअनुदानित शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ नये असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत शिक्षणाधिकाºयांनी माफी मागावी यासाठी आंदोलक शिक्षकांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यलय गाठले व शिक्षणाधिकारी यांच्यासोबत झालेल्या वादात त्या कार्यालयातील खुर्च्या-टेबलांची तोडफोड करीत टेबलावरील काचही फोडले. या प्रकारामुळे जिल्हा परिषद कार्यालयात चांगलेच वातावरण तापले व खळबळ माजील होती. होते. तसेच शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन सुरु केल्याने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले व त्यांनी जिल्हा कृती समितीचे प्रा.के.बी.बोरकर, प्रा.पी.पी.मेहर, व्ही.आर.पोगळे, जे.बी.पटले, ए.एन.कठाणे, आर. एस. जगणे, एस.डी. येळे, एम.टी. चौरे, एम.ए.उके, एम.एल.पटले, प्रतीक मेंढे यांच्यासह महिला-पुरु ष शिक्षकांना ताब्यात घेतले.
आपसी समजोत्यानंतर शिक्षकांची सुटका
शिक्षणाधिकारी कार्यालयात करण्यात आलेली तोडफोड बघता शिक्षणाधिकाºयांनी शिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. यावर ग्रामीण पोलिसांनी शिक्षकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सायंकाळी शिक्षणाधिकाºयांविरोधात आंदोलक शिक्षकांनीही शिविगाळ केल्याची तक्रार केली. यावर पोलिसांनी शिक्षणाधिकाºयांना बोलावून घेतले. दरम्यान, त्यांच्यात झालेली चर्चा व शिक्षकांचे भविष्य उद्ध्वस्त होवू नये यासाठी तक्रार मागे घेतली. यावर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिक्षकांना सोडून दिले.