शिक्षक समितीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे मांडल्या विविध समस्या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:32 AM2021-08-22T04:32:10+5:302021-08-22T04:32:10+5:30
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने शिक्षक समितीचे वरिष्ठ नेते मनोजकुमार दीक्षित यांच्या ...
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने शिक्षक समितीचे वरिष्ठ नेते मनोजकुमार दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त शिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली. या समस्या प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन सर्याम यांनी शिष्टमंडळाला दिले.
शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष मनोजकुमार दीक्षित, जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, कार्याध्यक्ष डी. एच. चौधरी, संचालक संदीप तिडके, एन. बी. बिसेन यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकांचे वेतन १ तारखेला करणे, ६ ऑगस्टचा एकस्तर वसुली व मूळ वेतनावर वेतन निश्चिती करण्यासंदर्भात अन्यायकारक पत्र रद्द करून जोपर्यंत चटोपाध्याय मंजूर होत नाही, तोपर्यंत एकस्तर सुरू करण्यासंदर्भात पत्रक नव्याने काढण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून हमीपत्र घेऊन १०० टक्के पात्र शिक्षकांना चटोपाध्याय व निवडश्रेणीचा लाभ देणे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त यांच्या पत्रानुसार ७ व्या वेतन आयोगानुसार कमाल मर्यादेत १५०० रुपये नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता अदा करणे अशा विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. सूत्रसंचालन उपाध्यक्ष वाय.आय.रहांगडाले यांनी तर आभार सरचिटणीस संदीप मेश्राम यांनी मानले. यावेळी शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष चिटणीस बी.एस.केसाळे, गोंदिया तालुकाध्यक्ष एस.डी.नागपुरे, कार्याध्यक्ष अनूप नागपुरे, देवरीचे तालुकाध्यक्ष गजानन पाटणकर, गोरेगावचे तालुकाध्यक्ष डी.डी.बिसेन, रोशन मस्करे, मा.बी.बी.मेंढे, जनार्दन गिरीपुंजे, उमेश रहांगडाले, टी.एम.शहारे, अनिल टेंभुर्णीकर, सुशील पाऊलझगडे, एस. टी. भालेकर, अशोक बिसेन, राजू गाढवे, गणेश लोहाडे, दिलीप लोधी, नरेश मेश्राम, महेश कवरे, मंगेश पर्वते, प्रकाश गावडकर, खेत्रीदास भेंडारकर, सुभाष मानकर, विनोद कोसमे, जीवन म्हसाखेत्री, राजेंद्र बोपचे, राजेश जैन, शोभेलाल ठाकूर, दिलीप होटे, दिलीप कुरुटकर तसेच शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.