विविध समस्यांसाठी अर्जुनी ग्रामपंचायतवर मोर्चा व धरणे
By admin | Published: July 27, 2014 12:11 AM2014-07-27T00:11:37+5:302014-07-27T00:11:37+5:30
भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या अर्जुनी शाखेद्वारे गावातील विविध प्रश्न व मागण्यांना घेऊन गुरुदेव चौकावरुन मोर्चा काढण्यात आला व ग्राम पंचायत कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
गोंदिया : भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या अर्जुनी शाखेद्वारे गावातील विविध प्रश्न व मागण्यांना घेऊन गुरुदेव चौकावरुन मोर्चा काढण्यात आला व ग्राम पंचायत कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा काँसिल सचिव मिलिंद गणविर, सहसचिव रामचंद्र पाटील, तालुका सचिव प्रल्हाद उके व तालुका सहसचिव भोजलाल हरिणखेडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. प्रमुख मागण्यांमध्ये रोजगार गारंटी कानून पांदण रस्ते व भार खचरच्या कामात बोगस हजेरीच्या तक्रारीची त्वरीत चौकशी करणे, मुरुम रायलटीतील गैरकारभाराची चौकशी व कार्यवाही करण्यात यावी, पक्के रास्ते, नाली व पथ दिव्यांची पुरेशी सोय करावी, रस्ते बांधकामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त गावात स्वच्छतेचा अभाव व स्वच्छता अभियान राबविणे, आवास योजनेचा लाभ रोहयो कामाच्या मजूरीचे त्वरीत वाटप करणेसह इतर मागण्यांचे निवेदन विस्तार अधिकारी पटले, सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आले. तीन दिवसांत मागण्या पूर्ण करून मजूरीचे वाटप एका आठवड्यात करण्यात येईल व इतर मागण्यांबाबत बिडीओकडे शिफारससह सादर करण्याचे आश्वासन दिले. मोर्चात शैलेश गजभिये, शशि पटले, चैतराम राऊत, दिनदयाल राऊत, रंजित गणविर, हिवराज सोनवाने, बाबुलाल गौतम, सुकराम रहांगडाले व इत्यादी कार्यकर्ते सहभागी होते.