महिला मेळाव्यात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 10:35 PM2018-01-18T22:35:19+5:302018-01-18T22:35:36+5:30

येथील पूर्ती पब्लिक स्कूलच्या वार्षिकोत्सवानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. यात नगर पंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व नगर सेविकांच्या सत्कारासह हळदी-कुंकू तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते.

Various programs in Women's Meet | महिला मेळाव्यात विविध कार्यक्रम

महिला मेळाव्यात विविध कार्यक्रम

Next
ठळक मुद्देचार शाळांचा सहभाग : अनेक स्पर्धांतून विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्यांचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : येथील पूर्ती पब्लिक स्कूलच्या वार्षिकोत्सवानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. यात नगर पंचायतचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व नगर सेविकांच्या सत्कारासह हळदी-कुंकू तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते.
उद्घाटन माजी जि.प. महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या हस्ते, माजी पं.स. सदस्य संगीता शहारे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. अतिथी म्हणून संस्था सचिव राजेंद्र बडोले, अध्यक्ष शालिनी बडोले, प्रेमलता दमाहे, नगरसेविका बबिता कोडापे, प्रतिभा साखरे, जयश्री साखरे, मनोरमा बडोले, पार्वता पंधरे, जान्हवी टेकाम, शशिकला ढेकवार, सुनिता उईके, दमयंता कोटांगले, सयन प्रधान, फुलवंता फरकुंडे, सविता वलथरे, मंगला चौधरी व मंगला करंडे उपस्थित होत्या.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, वीर बिरसा मुंडा व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. मागासवर्गीय बहुउद्देशिय संस्था रेंगेपार-कोहळीद्वारे संचालित समुहाचे सर्व प्राचार्य मुख्याध्यापक आणि कर्मचाºयांनी पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी नगर पंचायतच्या प्रथम नगरसेविका महिलांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
यानंतर विद्यार्थ्यांनी एकल नृत्य, समूह नृत्य, गीतगायन, नाटक आदी विविध स्पर्धा सादर केल्या. यात पूर्ती पब्लिक स्कूल, खिलेश महाविद्यालय, एस.आर.बी. महाविद्यालय, वीर बिरसा मुंडा आश्रम शाळा येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. यात गावातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदविला.
संचालन दर्शना मडावी व रिम्पी शर्मा यांनी केले. आभार पल्लवी शहारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी भूषण राऊत, खुशाल साखरे, एच.ए. चौधरी, विनिता फरकुंडे, प्रियंका मिश्रा, प्रज्ञा बैस, एम.पी. वैद्य, एन.पी. मोरे, अंजली अग्रवाल, संगीता वरकडे, वर्षा गायधने, आरती मच्छिरके, सीता दसरिया, सुरेखा इळपाते, मीनाक्षी ठाकूर आदींनी सहकार्य केले.

Web Title: Various programs in Women's Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा