१४ कोटीतून विविध कामे
By admin | Published: January 7, 2016 02:29 AM2016-01-07T02:29:34+5:302016-01-07T02:29:34+5:30
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविताना शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर बक्षीसे वाटली.
खर्च नियोजन पत्रिकेनुसार : पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार
गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविताना शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर बक्षीसे वाटली. जिल्ह्यातील ५५६ गावांना पुरस्कारापोटी १४ कोटी ७ लाख २५ हजार रुपये देण्यात आले. या गावांनी नियोजन पत्रीकेनुसारच खर्च केला आहे.
जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. यातून अवघ्या चार वर्षात जिल्हा तंटामुक्त झाला. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या आधारावर बक्षीसे वाटप करण्यात आली. त्या गावांनी बक्षीसाची रक्कम शासन निर्णयानुसार खर्च केल्याचे दिसून येत आहे. शासन निर्णयाप्रमाणे तंटामुक्तीच्या बक्षीस रकमेतून नवीन बांधकाम करता येत नाही असे स्पष्ट नमूद असल्यामुळे बांधकाम केले नाही.
प्रत्येक ग्रामपंचायत प्रचार प्रसिद्धीच्या पैसे खर्च करण्यास मागे राहीली नाही. विनियोग कार्यक्रमासाठी येणारा खर्च प्रचार प्रसिद्धीच्या रकमेतून करण्यात यावा असे स्पष्ट आदेश आहेत.
शासनाने साहित्य खरेदीसाठी दरवर्षी १ ते दोन हजार रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीला दिले. या संदर्भात खंड विकास अधिकाऱ्यांनी या विनियोगाच्या अहवालाचा शासनाकडे पाठविला. या पुरस्काराच्या रकमेचा विनियोग करताना जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत प्रचार प्रसिद्धीवर पैसे खर्च केल्याचे दाखविले.प्रचार प्रसिद्धीस मोडणारे फलक, बॅनर तयार करण्यात आले.
शासन ग्लोबल वार्मिंगवर नियंत्रण आणण्यासाठी ग्राम पर्यावरण संतुलीत योजना अंमलात आणली. तंटामुक्त मोहिमेच्या रकमेतून वृक्षारोपण करून या मोहमेच्या कार्यात भर घालण्यात आली. शासनाने नियोजन पत्रीकेत नमूद केल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण केल्याचे दाखविले.
शासनाने गावाचा विकास व्हावा हा उद्देश ठेवून लाखो रुपये प्रत्येक गावाला वाटले. तंटामुक्त मोहिमेवर शासनाने दिलेले १४ कोटी रुपये योग्य कामावर खर्च झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)