वसंतराव नाईक विकास महामंडळ देणार स्वयंरोजगारासाठी कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 04:28 PM2024-08-03T16:28:24+5:302024-08-03T16:29:22+5:30

Gondia : विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील लोकांकरिता कर्ज

Vasantrao Naik Development Corporation will provide loans for self-employment | वसंतराव नाईक विकास महामंडळ देणार स्वयंरोजगारासाठी कर्ज

Vasantrao Naik Development Corporation will provide loans for self-employment

लोकमत न्यूज नेटवर
गोंदिया :
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील लोकांकरिता व पहिलवान मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ या दोन उपकंपन्यांमार्फत वडार व रामोशी समाजातील लोकांकरिता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसाय, लघू उद्योग, वाहतूक क्षेत्रातील संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपरिक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू आहे. त्याचा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.


या आहेत कर्ज योजना

  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.
  • गट कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत ५० लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.
  • बीज भांडवल कर्ज योजना अंतर्गत ५ लाखांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो.
  • थेट कर्ज योजना अंतर्गत १ लाख रुपये बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो.


या आहेत अटी-शर्ती
योजनांमध्ये लाभार्थीला मुद्दल आणि व्याज बँकेत भरावे लागणार आहे. त्यानंतर महामंडळ व्याजाची रक्कम १२ टक्क्यांपर्यंत लाभार्थीच्या वैयक्तिक खात्यात जमा करत असते. या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना महामंडळाच्या www.vjnt.in या संकेत- स्थळावर उपलब्ध असून त्यावर बघता येतील.


येथे करा अर्ज
योजनेच्या लाभ घेण्यासाठी संकेतस्थळा- वरील पोर्टलद्वारे ऑनलाइन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. तसेच योजनेकरिता महा- मंडळाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. अधिक माहितीकरिता महामं- डळाच्या कार्यालयात येऊन संपर्क साधता येईल. जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती व संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शंकर कुमरे यांनी कळविले आहे.
 

Web Title: Vasantrao Naik Development Corporation will provide loans for self-employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.