वीर महेंद्र अमर रहे अमर रहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 05:00 AM2022-03-26T05:00:00+5:302022-03-26T05:00:02+5:30

मेरिटोरियस शाळेचे संस्थापक मुकेश अग्रवाल, शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सुकडी नाका ते करिश्मा चौक ते महात्मा गांधी पुतळा ते राणी अवंतीबाई चौक ते सी. जे. पटेल कॉलेजपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वीर महेंद्र यांचे अंत्यदर्शन घेण्याकरिता मोठ्या संख्येने महिला-पुरुष व विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. ही वीर जवानाची अंत्ययात्रा पाहून सर्वांच्या हृदयात देशभक्ती संचारली होती. सर्वांनी ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली.

Veer Mahendra amar rahe amar rahe! | वीर महेंद्र अमर रहे अमर रहे !

वीर महेंद्र अमर रहे अमर रहे !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा  : तालुक्यातील चिरेखनी येथील महेंद्र भास्कर पारधी हे भारतीय सैन्यात मराठा रेजिमेंटमध्ये मेजर (हवालदार) पदावर कार्यरत असताना अरूणाचल प्रदेश (डिब्रुगड) येथे बुधवारी पेट्रोलिंगदरम्यान हिमवृष्टीमुळे (दि. २३) शहीद झाले. या घटनेने अख्खा गोंदिया जिल्हा  शोकसागरात बुडाला. शहीद महेंद्र यांचे पार्थिव गुवाहाटी ते दिल्ली, दिल्ली ते नागपूर, नागपूर ते कामठी मुख्यालय व तिथून शुक्रवारी (दि. २५) तिरोडा तालुक्यातील बिरसी (फाटा) येथे दाखल झाले. यावेळी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. ‘वीर महेंद्र अमर रहे’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर निनादला होता.
बिरसी येथे काहीवेळ वीर महेंद्र यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे माजी सैनिकांच्यावतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुचाकी रॅली व चारचाकी वाहनांच्या रांगेसह ही अंत्ययात्रा तिरोडा शहरातील सुकडी नाका येथे पोहोचली. तेथे उपस्थित जनसमुदायाने वीर महेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली. 
मेरिटोरियस शाळेचे संस्थापक मुकेश अग्रवाल, शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सुकडी नाका ते करिश्मा चौक ते महात्मा गांधी पुतळा ते राणी अवंतीबाई चौक ते सी. जे. पटेल कॉलेजपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वीर महेंद्र यांचे अंत्यदर्शन घेण्याकरिता मोठ्या संख्येने महिला-पुरुष व विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. ही वीर जवानाची अंत्ययात्रा पाहून सर्वांच्या हृदयात देशभक्ती संचारली होती. सर्वांनी ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली. तिरोडा शहर व ग्राम चिरेखनी येथील व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने काही वेळासाठी बंद ठेवली होती. 
सर्वांना वीर महेंद्र यांचे अंत्यदर्शन घेण्याचा ध्यास लागला होता. सर्वत्र ‘वीर महेंद्र अमर रहे’चा जयघोष सुरू होता. 

 शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 
 ग्राम चिरेखनीच्या प्रवेशद्वारातून ही अंत्ययात्रा वीर महेंद्र यांच्या घरी पोहोचली. तेथे आधीच हजारोंच्या संख्येने अंत्यदर्शनासाठी नागरिक उपस्थित होते. सैन्यदलाचे जवान व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तेथे गावातील रितीरिवाजानुसार माल्यार्पण करून अंत्यदर्शन घेण्यात आले. त्यानंतर गाव प्रदक्षिणा घालण्यात आली व स्मशानभूमीकडे प्रस्थान झाले. तिरोडा व ग्राम चिरेखनी येथे न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली होती. चिरेखनी स्मशानभूमीत हजारो लोकांच्या उपस्थितीत महेंद्र यांना सलामी देण्यात आली. वीर महेंद्र यांच्या मुलांच्या हस्ते पार्थिवाला अग्नी देण्यात आला. यावेळी हेमंत पटले, माजी आमदार दिलीप बंसोड, जिल्हा परिषद सदस्य चत्रभुज बिसेन, जिल्हा परिषद सदस्य पवन पटले, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमईवार, लक्ष्मीनारायण दुबे, मुकेश अग्रवाल, देवानंद शहारे उपस्थित होते.

 

Web Title: Veer Mahendra amar rahe amar rahe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Soldierसैनिक