वीर शहीद गौरव कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:35 AM2021-02-17T04:35:00+5:302021-02-17T04:35:00+5:30
याप्रसंगी सत्कारमूर्ती वीरपत्नी प्रमिला सखाराम ठाकरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वीर शहीद सखाराम ...
याप्रसंगी सत्कारमूर्ती वीरपत्नी प्रमिला सखाराम ठाकरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वीर शहीद सखाराम ठाकरे यांच्या छायािचत्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था रेंगेपार कोहळीचे सचिव राजेंद्र बडोले, प्रमुख अतिथी म्हणून शहीद पत्नी प्रमिला सखाराम ठाकरे, रेखराम कटरे, मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था रेंगेपार कोहळीची अध्यक्ष शालिनी बडोले, एस.आर.बी. कनिष्ठ महाविद्यालय सालेकसाचे प्राचार्य एल.बी.चन्ने, पूर्ती पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक भूषण एम. राऊत हे उपस्थित होते. अध्यक्षांनी मातृभूमीसाठी बलिदान करणाचा वीर शहिदांचे स्मरण केले. त्याचप्रमाणे, देशसेवेपेक्षा उदात्त असे काहीच नाही, या शब्दात शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विकास जांभुळकर, उमेश नागपुरे, अंज़ली अग्रवाल, आरती मच्छिरके, महेंद्र वैद्य, महेश टेंभुर्णे, सुजीत कोटांगले, अमित कोटांगले, साहील परिहार, शैलेश सोनकनवरे, सुरेखा वैकुंठी ने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार भूषण राऊत यांनी केले.