वीरांगना राणी दुर्गावती बलिदान दिवस कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:11 PM2019-06-25T22:11:43+5:302019-06-25T22:12:43+5:30
गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या आदिवासी गोंडीयन धर्माची पवित्र भूमि कचारगड (धनेगाव) सालेकसा येथे २४ जून रोजी पारी कोपार लिंगो मॉ काली कंकाली देवस्थान येथे दुर्गाप्रसाद कोकोडे यांच्या अध्यक्षतेत वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांचा बलिदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
दरेकसा : गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या आदिवासी गोंडीयन धर्माची पवित्र भूमि कचारगड (धनेगाव) सालेकसा येथे २४ जून रोजी पारी कोपार लिंगो मॉ काली कंकाली देवस्थान येथे दुर्गाप्रसाद कोकोडे यांच्या अध्यक्षतेत वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांचा बलिदान दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते तेजराम मडावी, देवकिसन दुर्गे, रामेश्वर पंधरे, जगदीश मडावी, प्रमिला सिंद्रामे, बारेलाल वरवडे, संतोष पंधरे, मनिष पुसाम, लखन टेकाम, रुपराज कोडापे, सोनू नेताम उपस्थित होते. सर्वप्रथम गोंडवाना साम्राज्याच्या सप्तरंगी झेंड्याचे पूजन करण्यात आले.त्यानंतर विरांगणा राणी दुर्गावती मडावी यांच्या पुतळ्याचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी तेजराम मडावी यांनी राणी दुर्गावती यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच त्यांचा आदर्श प्रत्येकाने बाळगण्याचे आवाहन केले. रामेश्वर पंधरे यांनी राणी दुर्गावती शौर्य गाथेचे कौतुक केले.अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी गोंडीयन महिला शक्तीचे पुढे येणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेशाम टेकाम यांनी केले तर आभार सचिव संतोष पंधरे यांनी मानले.