ते वाहन अखेर पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:27 AM2021-03-08T04:27:31+5:302021-03-08T04:27:31+5:30

सडक - अर्जुनी : नागपूर येथून चोरी केलेल्या टाटा नेक्सन गाडीने वाहतूक पोलिसाला धडक ...

That vehicle is finally in the hands of the police | ते वाहन अखेर पोलिसांच्या हाती

ते वाहन अखेर पोलिसांच्या हाती

Next

सडक - अर्जुनी : नागपूर येथून चोरी केलेल्या टाटा नेक्सन गाडीने वाहतूक पोलिसाला धडक देऊन पसार झालेल्या चोरट्याला पकडण्यात डुग्गीपार पोलिसांना अखेर यश आले आहे. सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी वाहन चोरट्याला ताब्यात घेतले असून, वाहन जप्त केले आहे. पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव संदेश सिद्धार्थ भाईर (३७) रा. अजनी, नागपूर असे आहे.

संदेश भोईर याने नागपूर येथे टाटा नेक्सन हे वाहन चोरले व विना क्रमांकाच्या या वाहनाने वाहतूक पोलीस अमलदारास धडक देऊन तो पसार झाला होता. याबाबत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांना माहिती मिळाल्याने त्यांनी डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वागडे यांना माहिती दिली. त्यानुसार, वांगडे यांनी कोहमारा चौक येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. अशात रायपरकडून एक संशयित वाहन कोहमारा चौकात आले व नाकाबंदी बघून चालकाने यु-टर्न मारून परत देवरीकडे जात असल्याचे बघून ठाणेदार वांगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक खासगी वाहन थांबवून त्याचा सिनेस्टाईल पाठलाग केला. पोलीस आपला पाठलाग सोडत नसल्याचे बघून संदेश भोईर याने वाहन ग्राम बाम्हणी - खडकी येथे गावाबाहेर सोडून जंगलाच्या दिशेने धाव घेतली. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले व वाहनही जप्त करून डुग्गीपार पोलीस ठाण्यात आणले. याबाबत नागपूर पोलिसांना पुढील कारवाईबाबत माहिती देण्यात आली आहे. ही कार्यवाही ठाणेदार वांगडे, हवालदार हरिश्चंद्र शेंडे, जगदेश्वर बिसेन, रमेश हलामी, पोलीस नायक झुमन वाडई, शिपाई घनश्याम मुळे यांनी केली आहे.

Web Title: That vehicle is finally in the hands of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.