परिवहन विभाग राबविणार महिनाभर वाहन तपासणी मोहीम
By admin | Published: July 1, 2014 11:33 PM2014-07-01T23:33:37+5:302014-07-01T23:33:37+5:30
सर्व अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर, टँकर, प्रवासी बसेस व मध्यम वाहनांची केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नियम क्र.६२ मधील तरतूदीनुसार योग्यता प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी संपूर्ण जुलै महिन्यात परिवहन
गोंदिया : सर्व अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर, टँकर, प्रवासी बसेस व मध्यम वाहनांची केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नियम क्र.६२ मधील तरतूदीनुसार योग्यता प्रमाणपत्र तपासणी करण्यासाठी संपूर्ण जुलै महिन्यात परिवहन विभागाकडून विशेष तपासणी मोहीम राबविली जाणार आहे.
१ ते ३१ जुलै २०१४ या कालावधीत योग्यता प्रमाणपत्राशिवाय चालविल्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. त्यात योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहने रस्त्यावरण चालविली जात असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर वाहनांचा रस्त्यावर वापर होणार नाही या दृष्टीनेही कारवाई करण्यात येणार आहे.
त्यानंतर पुढील महिन्यात, १ ते ३१ आॅगस्ट २०१४ या काळात खासगी प्रवासी बसेसच्या तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या तपासणी मोहीमेत बसेसची रस्ता सुरक्षा दृष्टीकोणातून महत्वाचा तांत्रिक बाबीची तपासणी करण्यात येईल व दोषी आढळून आलेल्या बसेसवर मोटार वाहन कायदा व नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
परिवहन संवर्गातील ज्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र संपलेले आहेत त्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यासाठी आपले वाहन त्वरीत कार्यालयात सादर करावे, तसेच वाहनांमध्ये वाहनाची सर्व वैध कागदपत्रे (आर.सी.बुक, परवाना, ईन्सुरेन्स, पीयूसी, फिटनेस, कर भरल्यचा पुरावा, ई सोबत ठेवावे व तपासणी अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्यास सदर कागदपत्रे सादर करावे, अन्यथा दोषी आढळून आलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायदा नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)