डोंगरगडला टोमॅटो घेऊन जाणारे वाहन उलटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:52+5:302021-05-12T04:29:52+5:30
गोंदिया : छत्तीसगडच्या डोंगरगड येथील मालवाहक वाहन क्रमांक सीजी ०७ बीजी ९६३६ हे वाहन खमारीसमोरील वळणावर उलटले. ही घटना ...
गोंदिया : छत्तीसगडच्या डोंगरगड येथील मालवाहक वाहन क्रमांक सीजी ०७ बीजी ९६३६ हे वाहन खमारीसमोरील वळणावर उलटले. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात चालक व वाहक किरकोळ जखमी झाले.
छत्तीसगडच्या डोंगरगड येथून भाजीपाला घेऊन गोंदियाला आलेला मालवाहक गोंदियाच्या भाजी बाजारातून टोमॅटो घेऊन आमगावमार्गे डोंगरगडकडे जात असताना ११ मे रोजी सकाळी ११.३० वाजता सुमारास उलटल. यात चालक व वाहक किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गोंदियाचे वाहतूक पोलीस घटनास्थळावर पोहोचले. पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस उपनिरीक्षक महेश पवार, सहाय्यक फौजदार हिरालाल गेडाम, कैलास कुरसुंग व भास्कर हरिणखेडे त्या ठिकाणी दाखल झाले. रस्त्याच्या मधोमध हे वाहन उलटल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जिल्हा वाहतूक पोलिसांंनी क्रेनच्या सहाय्याने वाहन उचलून बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीतपणे सुरु झाली.