उभ्या ट्रकला धडकला ट्रक
By admin | Published: February 13, 2017 12:19 AM2017-02-13T00:19:03+5:302017-02-13T00:19:03+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अर्बन बँकेसमोर उभ्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने मागून धडक दिली.
चालक व वाहक गंभीर : दोघांना नागपूरला हलविले
देवरी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील अर्बन बँकेसमोर उभ्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने मागून धडक दिली. रविवारी (दि.१२) पहाटे ४ वाजता दरम्यान हा अपघात घडला असून यात ट्रक चालक व वाहक दोघे गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे ट्रकच्या कॅबीनमध्ये अडकलेल्या वाहकाला क्रेनच्या मदतीने बाहेर काढून दोघांना नागपूरला हलविण्यात आले.
सविस्तर असे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने नागपूर वरून दुर्ग (छत्तीसगड) कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ४९/१०५० ने अर्बन बँकेसमोर उभ्या ट्रक क्रमांक एमएच ४९/५३९ ला भरधाव वेगात मागून धडक दिली. रविवारी (दि.१२) पहाटे ४ वाजता दरम्यान घडलेला हा अपघात इतका जबर होता की, यात ट्रक क्रमांक एमएच ४९/१०५० चे कॅबीन चंदामेंदा झाले. एवढेच नव्हे तर चालक रामजी बतीरायाम शाहू (४०,रा.शिवारीटोला, छुरीया) व वाहक चैनसिंग भारत नेताम (२२,रा.गोपालपूर,छुरीया) हे दोघे गंभीर जखमी झाले व वाहक चैनसिंग केबीनमध्ये अडक ला.
सकाळी ६ वाजता दरम्यान ही बातमी परसली व नगरसेवक रितेश अग्रवाल, राष्ट्रवादी ट्रांसपोर्ट आघाडीचे अध्यत्र कक्के भाटीया, सामाजीक कार्यकर्ता वड्डू भाटीया, पोलीस कर्मचारी प्रकाश गायधने व लांडगे यांनी कर्मचारी व क्रेनच्या मदतीने वाहक चैनसिंग याला बाहेर काढले. दोघांना येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना नागपूरला हलविण्यात आले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून तपास ठाणेदार राजेश तटकरे करीत आहेत.