सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखाना वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:37 AM2017-09-06T00:37:00+5:302017-09-06T00:37:15+5:30
ग्रामीण भागातील पशुपालकांना त्यांच्या पशुंवर वेळीच उपचाराची सोय व्हावी. यासाठी शासनाने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केले. मात्र सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सौंदड : ग्रामीण भागातील पशुपालकांना त्यांच्या पशुंवर वेळीच उपचाराची सोय व्हावी. यासाठी शासनाने पशुवैद्यकीय दवाखाने सुरू केले. मात्र सौंदड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. तर औषधांचा सुध्दा अभाव असल्याने हा दवाखाना केवळ नाममात्र ठरत आहे.
येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला शासनाने २०१२-१३ मध्ये सर्वोत्कृष्ठ कार्य पुरस्कार तर २०१४ मध्ये राज्य पुरस्काराने सम्मानित केले. मात्र यानंतरही सध्या पशुपालकांना येथे वैद्यकीय अधिकारी व औषधे उपलब्ध राहत नसल्याने विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे पशुपालकांना खाजगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागत आहे. परिणामी गोरगरीब पशुपालकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात कार्यरत पी.पी. मारगाये यांची पाच महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांनतर त्यांचा चार्ज पर्यक्षेकाकडे देण्यात आला. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटूनही ते येथे रूजू झाले नाही. त्यामुळे येथे जनावरांना उपचारासाठी घेऊन येणाºया पशुपालकांची गैरसोय होत आहे. शेंडा कोयलारी येथे कार्यरत नरेश कुंभारे पशुधन पर्यवेक्षक यांना पी.पी. मारगाये सेवानिवृत्त झाल्यानंतर सौंदड येथील दवाखान्याचे अतिरिक्त प्रभार देण्यात आला. शेंडा कोयलारी परिसरातील १० गावे त्यांच्याकडे असल्यामुळे सौंदड येथे ते आठवड्यात केवळ तीन दिवस येतात. सौंदड, राका पिपरी, पळसगाव, सावंगी, ब्राम्हणी, बोपाबोडी, फुटाळा, भद्दयाटोला, श्रीरामनगर अशी दहा गावे असून जवळपास ६५०० अशी जनावरांची संख्या आहे. या भागातील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. त्यामुळे पशुंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
रिक्त पदांची परांपरा कायम
गोंदिया जिल्हाची स्थापन झाली तेव्हापासून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहे. ही पदे अद्यापही भरण्यात आली नाही. जिल्ह्यात एकूण ७२ दवाखाने आहेत. त्यात २९ दवाखान्यामध्ये पदे रिक्त आहेत. परिणामी एका डॉक्टरवर दोन दवाखान्याचा भार आहे. पशुधन विकास अधिकारी २२ पदे तर पशुधन पर्यवेक्षकाची ७ पदे रिक्त आहेत.
पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी औषध साठा उपलब्ध झाला आहे. त्याचे वाटप लवकर पंचायत समितीच्या माध्यमातून केले जाईल. सौंदड येथे डॉ. रोशन आंदेशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पण काही अडचणीमुळे सध्या त्यांची जिल्ह्याच्या ठिकाणी नियुक्ती केली आहे.
- डॉ.राजेश वासनिक
जिल्हा पशुधन विकास अधिकारी.