पाण्याच्या टाकीवर ‘वीरुगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:20 AM2018-03-28T00:20:00+5:302018-03-28T00:20:00+5:30

तालुक्यातील खमारी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांवर कारवाई करुन त्यांना पदावरुन हटविण्यात यावे. या मागणीला घेऊन याच गावातील मोहन तावाडे यांनी मंगळवारी (दि.२७) सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावातील पाणी टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन सुरू केले.

'Veurugi' on the water tank | पाण्याच्या टाकीवर ‘वीरुगिरी’

पाण्याच्या टाकीवर ‘वीरुगिरी’

googlenewsNext
ठळक मुद्देउपसरपंच, सदस्यांवर कारवाईची मागणी : प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : तालुक्यातील खमारी येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांवर कारवाई करुन त्यांना पदावरुन हटविण्यात यावे. या मागणीला घेऊन याच गावातील मोहन तावाडे यांनी मंगळवारी (दि.२७) सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावातील पाणी टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन सुरू केले. जोपर्यंत कारवाहीचे लेखी आश्वासन मिळत तोपर्यंत पाणी टाकीवरुन उतरणार नाही अशी भूमिका मोहन घेतल्याने पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार मोहन तावाडे यांची पत्नी विमल तावाडे खमारी येथील सरपंच आहे. मात्र त्यांना तिसरे अपत्य झाले. त्यामुळे त्यांना नियमानुसार सरपंचपदावर राहत नाही. यावरुन उपसरपंच व सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला. सदस्यांनी आक्षेप घेण्यापूर्वीच सरपंचानी पदाचा राजीनामा दिला होता. त्यावर अद्याप निर्णय व्हायचा आहे. तर याच ग्रामपंचायतचे उपसरपंच कैलास साखरे यांना आधी दोन अपत्ये होती. त्यानंतर १२ फेब्रुवारीला त्यांना तिसरे अपत्य झाले. मात्र त्यांनी अद्यापही पदाचा राजीनामा दिला नाही. जो नियम सरंपचाला लागू होतो तोच उपसरपंच साखरे यांना सुध्दा लागू आहे. मात्र ते प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचा तावाडे यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्यावर २४ तासात कारवाही करुन त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे. ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांच्या घरी शौचालये नसून त्यांनी वर्षभरापासून घर टॅक्स भरले नाही. त्यामुळे त्यांच्यावर सुध्दा कारवाई करुन पदावरुन दूर करण्यात यावे. अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा मोहन तावाडे यांनी निवडणूक आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला होता. मात्र प्रशासनातर्फे उपसरपंच आणि सदस्यांवर कुठलीच कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मोहनने मंगळवारी (दि.२७) सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावातील ग्रामपंचायतला लागून असलेल्या पाणी टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन सुरू केले. जोपर्यंत उपसरपंच व तीन सदस्यांवर कारवाही होत नाही. तोपर्यंत पाणी टाकीवरुन खाली उतरणार नाही अशी भूमिका मोहनने घेतली आहे. दरम्यान याची माहिती गावात पसरताच गावकरी ग्रामपंचायतजवळ मोठ्या संख्येनी गोळा झाले. तसेच मोहनला खाली उतरण्याची विनंती करीत होते. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारी ४ वाजता तहसीलदार रहांगडाले यांच्या लेखी आश्वासनंतर मोहनने विरुगीरी आंदोलन मागे घेत तो टाकीवरुन खाली उतरला.
महिलांचे मोहनला समर्थन
खमारी येथील विजू उके, सविता कोरे, रेखा बहेकार, वनमाला बोरकर, आशा शिवणकर, भागरथा लाडे, अनिता तरोणे यांच्यासह इतर महिलांनी मोहन तावाडे यांनी केलेल्या मागण्या योग्य आहे. नियमानुसार उपसरपंच आणि सदस्यांवर प्रशासनाने कारवाही करण्याची गरज असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.
सरपंचावर अविश्वास पारित
खमारी येथील सरपंच विमल तावाडे यांच्यावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. यासाठी मंगळवारी खमारी ग्रामपंचायतमध्ये सभा घेण्यात आली. त्यात सदस्यांनी सरपंच तावाडे यांच्या विरोधात मतदान केल्याने त्यांच्यावरील अविश्वास ठरावा पारित करण्यात आला. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोंदियाचे तहसीलदार उपस्थित होते.

Web Title: 'Veurugi' on the water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.