बळीराजा संकटात अन् सरकार निद्रावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 11:40 PM2019-07-28T23:40:00+5:302019-07-28T23:41:00+5:30

तालुक्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोंळबल्या, पावसाअभावी बियाणे अंकुरीत न झाल्याने बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकरी कुटुंबाला आधाराची गरज असताना सरकार निद्रावस्थेत असल्याचे प्रतिपादन माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले.

The victim is in trouble and the government sleeps | बळीराजा संकटात अन् सरकार निद्रावस्थेत

बळीराजा संकटात अन् सरकार निद्रावस्थेत

Next
ठळक मुद्देराजेंद्र जैन : जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, शैक्षणिक शुल्क माफ करा

लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुक्यात अल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोंळबल्या, पावसाअभावी बियाणे अंकुरीत न झाल्याने बळीराजावर अस्मानी संकट ओढवले आहे. शेतकरी कुटुंबाला आधाराची गरज असताना सरकार निद्रावस्थेत असल्याचे प्रतिपादन माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले.
आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव विजय शिवणकर,रमेश ताराम,टिकाराम मेंढे, पं.स.सभापती वंदना बोरकर, जि.प.सदस्य सुखराम फुंडे, जि.प.सदस्य सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, तुंडीलाल कटरे, मुक्तानंद पटले, सिंधू भुते, तालुका अध्यक्ष कमलबापू बहेकार, माजी बालकल्याण सभापती संगीता दोनोडे, कविता रहांगडाले, उषा हर्षे, जयश्री फुंडकर, अ‍ॅड. सुषमा शेंडे, आशा बिसेन, उपसरपंच महेंद्र रहांगडाले,सरपंच सुनील ब्राम्हणकर, तुलेंद्र कटरे,जनार्धन शिंगाडे,दीनदयाल चौरागडे, रविंद्र मेश्राम, अंजू बिसेन, सिताराम फुंडे उपस्थित होते.
संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून बळीराजा संकटात सापडला आहे.
त्यामुळे शासनाने त्वरीत शेतकऱ्यांना जिवनाआवश्यक वस्तुंची पूर्तत: करावी आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विजय शिवणकर यांनी दिला.
सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप नरेश माहेश्वरी, सुरेश हर्षे यांनी केला.यानंतर गांधी चौकातून मोटारसायकल रॅली काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात तिरथ येटरे, रवि क्षिरसागर, संजू राऊत, तुकडूदास रहांगडाले,संतोष रहांगडाले, विनोद बोरकर, सिध्दार्थ डोंगरे, सुरेंद्र कोटांगले, विजय मुनेश्वर, रविंद्र कोटांगले, पुरुषोत्तम चुटे, बापू भांडारकर, लक्ष्मी येळे, दामोदर शरणागत, भानुप्रसाद कटरे, धनराज बोपचे, मुुलचंद बघेले, प्रदीप फरकुंडे, महेंद्र राऊत, खुमन कटरे, जयश्री पुंडकर, विनोद बोरकर, रवि क्षिरसागर, श्यामराज श्रीराम नोनारे, ईश्वरदास पाथोडे, किशोर रहांगडाले, हरिचंद रहांगडाले, अंतरिक्ष बहेकार, बबनलाल पटले, निखिल पशीने, पियूष छा, मोरेश्वर चापले, प्रलाद बिसेन, राजुकमार गडे, सीताराम फुंडे, सी.के.बिसेन, गोपालकृष्ण रहिले, बाबुलाल कठाणे, अशोक राऊत,नंदकिशोर रहांगडाले, आस्था बिसेन, सुनील भोंडेकर, टिकाराम भांडारकर, भुमेश्वर शिवणकर, ताराचंद काटेखाये यांचा समावेश होता.
मागण्या मान्य करा
तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी,पशुधन विम्याचे कार्य खाजगी स्तरावरुन न करता शासकीय स्तरावरुन करावे,कृषी पंपासाठी विद्युत जोडणी द्यावी व सोलर पंपाची अट रद्द करावी, विद्युत पंपाना १६ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा,रासायनिक खताच्या किंमती कमी कराव्या, दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे.

Web Title: The victim is in trouble and the government sleeps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.