विदर्भ हे जगाचे टायगर कॅपिटल; नवेगाव प्रकल्पात दाेन नव्या पाहुण्यांचे आगमन

By अंकुश गुंडावार | Published: May 20, 2023 05:25 PM2023-05-20T17:25:54+5:302023-05-20T17:26:29+5:30

Gondia News ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातून आणण्यात आलेल्या वाघीण नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात शनिवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आल्या.

Vidarbha is the tiger capital of the world; Arrival of two new guests in Navegaon project | विदर्भ हे जगाचे टायगर कॅपिटल; नवेगाव प्रकल्पात दाेन नव्या पाहुण्यांचे आगमन

विदर्भ हे जगाचे टायगर कॅपिटल; नवेगाव प्रकल्पात दाेन नव्या पाहुण्यांचे आगमन

googlenewsNext

अंकुश गुंडावार
गोंदिया : जगात चौदा देशांत वाघांचा अधिवास आहे. वाघांची सर्वाधिक संख्या ही भारतात व त्यातही महाराष्ट्रात विदर्भात आहे. महाराष्ट्रात २०१४ मध्ये १९० वाघ होते ते २०१९ च्या गणनेत ते ३१२ झाले आणि आता ५०० च्या वर वाघांची संख्या आहे. यात सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. याचाच अर्थ विदर्भ हे जगाचे टायगर कॅपिटल झाले आहे, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातून आणण्यात आलेल्या वाघीण नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात शनिवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खा. सुनील मेंढे, अशोक नेते, आ. विजय रहांगडाले, मनोहर चंद्रिकापुरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक रंगनाथ नाईकडे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी प्रकल्प डॉ. रामगावकर, विशेष पोलिस महासंचालक संदीप पाटील, उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा जयरामेगौडा आर, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपसंचालक पवन जेफ, विभागीय वन अधिकारी प्रदीप पाटील व राजेंद्र सदगीर यावेळी उपस्थित होते. भारत सरकारने पहिल्या टप्प्यात पाच वाघांचे स्थानांतरण करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज नवेगाव नागझिरा प्रकल्पात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी ११ टायगर असून, वीस वाघ अधिवास क्षमता आहे. वन्यजीव प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांसाठी नवेगाव नागझिरा आकर्षण केंद्र ठरणार आहे.

शंभर वाघ मित्रांची नियुक्ती

पुढील टप्प्यात तीन वाघांचे स्थानांतरण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. नवेगाव नागझिरा प्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. स्थानिक ४०० युवकांना प्रशिक्षण, तसेच शंभर वाघमित्र नेमले आहेत. वाघमित्रांना दोन हजार रुपये सन्माननिधी देण्यात येत येतो; तसेच पर्यटकांसाठी अत्याधुनिक सहा वाहने देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सारस संवर्धनासाठी ६२ कोटी रुपयांचा आराखडा

सारस संवर्धनासाठी ६२ कोटींचा आराखडा बनविण्याच्या न्यायालयाच्या सूचना आहेत. त्यावर काम सुरू असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. पाच वाघांचे स्थानांतरण गेली दहा महिने वनविभाग या विषयावर काम करीत होते. माळढोक व गिधाड पक्षी संवर्धनसुद्धा गरजेचे असून, त्यासाठी वनविभाग आराखडा बनवीत असल्याचे त्यांनी सांगितले. चिमण्या आता कमी दिसतात. येणाऱ्या पिढीला चिमणी केवळ कथा, कवितांतूनच समजू नये म्हणून चिमण्यांचे संवर्धन आवश्यक असल्याचे सांगितले.

Web Title: Vidarbha is the tiger capital of the world; Arrival of two new guests in Navegaon project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.