विदर्भ समाज गौरव पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:34 AM2018-12-20T00:34:27+5:302018-12-20T00:34:48+5:30
विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेच्या वतीने विदर्भ समाज गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात कवि संमेलनाने झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेच्या वतीने विदर्भ समाज गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात कवि संमेलनाने झाली. कवी संमेलनात संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष मिलिंद मेश्राम यांनी दीप प्रज्वलित करुन केली. कवी संमेलनाचे संचालन कवी डॉ. नुरजहा पठान यांनी केले. कवी संमेलनामध्ये कवी प्रा. युवराज गंगाराम, मनोज बोरकर, मिलींद रंगारी, निखिलेश यादव, शशी तिवारी, वाय.पी. मेश्राम, चैतन्य तुरकर, सुरेंद्र जगने, दिनेश अंबादे यांनी कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. गोपालदास अग्रवाल, प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगरसेवक सुनील भालेराव, रतन वासनिक, सरपंच मुनेश रहांगडाले, संजय टेंभरे, योगराज रहांगडाले उपस्थित होते. विदर्भ समाज गौरव पुरस्कार निमित्त डॉ. नुरजहा लिखीत तलवार पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विदर्भ गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन वाय.पी. मेश्राम व सिंधू वंजारी यांनी केले तर आभार डी.बी. लांजेवार यांनी मानले. यशस्वितेसाठी नरेंद्र हुमणे, दिलीप शहारे, रमाकांत मेश्राम, विनोद बन्सोड, सुधाकर बोरकर, मनोज खांडेकर, भूमिता ठाकरे, अतुल रामटेके, अंजिरा खोब्रागडे, लांजेवार, अर्पिता रहांगडाले, अनिल रहांगडाले, खुमेश ठाकुर व संघटनेच्या सभासदांनी सहकार्य केले.