दर रविवारी ग्राम सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:37 AM2018-01-31T00:37:38+5:302018-01-31T00:38:08+5:30

स्वच्छता ठेवा याबाबत उपदेश न देता त्याची सुरूवात स्वत:पासून करावी यासाठी ग्राम येगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत.

Village cleaning every Sunday | दर रविवारी ग्राम सफाई

दर रविवारी ग्राम सफाई

Next
ठळक मुद्दे‘नो स्पीच’ ग्रुपचा उपक्रम : विद्यार्थी उतरले जनजागृतीसाठी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
इटखेडा : स्वच्छता ठेवा याबाबत उपदेश न देता त्याची सुरूवात स्वत:पासून करावी यासाठी ग्राम येगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. ‘नो स्पीच’ या ग्रुपच्या माध्यमातून हे विद्यार्थी दर रविवारी गावातील एक गल्ली स्वच्छ करणार असून गावकºयांना स्वच्छता ठेवण्यासाठी प्रेरीत करणार आहेत.
आपले गाव परिसर स्वच्छ ठेवा यासाठी जनजागृती केली जात आहे. कुणी रॅली काढून तर कुणी भाषण देऊन जनजागृतीचे कार्य करीत आहेत. मात्र यापेक्षा स्वच्छतेची सुरूवात स्वत:पासून करावी हा उद्देश बाळगून येगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘नो स्पीच’ गु्रपची स्थापना केली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी आता दर रविवारी दोन तास ग्राम सफाईचे काम करणार असून एक गल्ली स्वच्छ करून गावकºयांना स्वच्छतेसाठी प्रेरीत करणार आहेत.
यासाठी सकाळी शाळेतील विद्यार्थी झाडू, खराटे व टोपल्या घेऊन ग्राम स्वच्छतेसाठी सरसावले. विद्यार्थ्यांना प्रेरीत करणारे भूषण लोहारे उपस्थित राहून मार्गदर्शन करीत होते.
याप्रसंगी मुख्याध्यापक मनोज खुरपुडे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अम्बादास हुकरे हे सुद्धा उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याची स्तुती करीत विद्यार्थ्यांना प्रेरीत केले. हा उपक्रम दर रविवारी घेण्याच्या संकल्पाने व गावकºयांना यांच्याशी जोडण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी दर्शविला.

Web Title: Village cleaning every Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.