ग्रामविकास अधिकारी आत्महत्या प्रकरण चिघळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:41+5:302021-04-02T04:30:41+5:30

कुऱ्हाडीचे ग्रामविकास अधिकारी शिवकुमार रहांगडाले यांनी विषारी औषधी प्राशन केल्याने सोमवारी त्याचा मृत्यू झाला. सरपंच पतीला त्वरित ...

The village development officer sucked the suicide case | ग्रामविकास अधिकारी आत्महत्या प्रकरण चिघळले

ग्रामविकास अधिकारी आत्महत्या प्रकरण चिघळले

Next

कुऱ्हाडीचे ग्रामविकास अधिकारी शिवकुमार रहांगडाले यांनी विषारी औषधी प्राशन केल्याने सोमवारी त्याचा मृत्यू झाला. सरपंच पतीला त्वरित अटक करा त्याशिवाय अंत्यसंस्कार होणार नाही अशी भूमिका पत्नी अंतकला रहांगडाले व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनने घेतली होती. सरपंच अल्का पारधी यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम ३९ अंतर्गत पदमुक्त करा अशी मागणी ग्रामसेवक संघटनेनी लावून धरली होती. तर सरपंच संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व सरपंच गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गुरुवारी पंचायत समिती दालनात एकत्र आले. याच दरम्यान ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्षासह ग्रामसेवक समोरासमोर आले. यामुळे वाद विकोपाला जाणार या भीतीने गटविकास अधिकारी झामसिंग टेंभरे यांनी वरिष्ठ अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर परिस्थितीची माहिती दिली. त्यामुळे गोंदिया मुख्यालयातुन जलदगती कारवाई बलासह आमगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामुळे गोरेगाव पंचायत समितीला छावणीचे स्वरूप आले होते. कोरोनाचा प्रकोप पाहता दोन व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ नये, अशी समज दिल्याने दोन सरपंच यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी झामसिंग टेंभरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गटविकास अधिकारी यांनी या निवेदनाचे त्वरित सरपंच संघटनेला लेखी उत्तर दिले. ग्रामसेवक संघटनेनी सरपंच अल्का पारधी यांच्यावर कलम ३९ ची मागणी मागे घेणार असे आश्वासन दिले. पण कोणताही पर्यायी मार्ग न काढता आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती सरपंच उपसरपंच संघटनेनी दिली.

Web Title: The village development officer sucked the suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.