ग्रामसेवकांनी सोपविल्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे चाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 09:58 PM2019-08-29T21:58:52+5:302019-08-29T21:59:13+5:30
ग्रामसेवकांनी त्यांच्या वेतनातील त्रृटी,पदोन्नती आणि रिक्त पदांच्या मागणीला घेऊन ९ आॅगस्टपासून राज्यभरात ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले.मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही.परिणामी ग्रामसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यभरातील २२ हजार ग्रामसेवकांनी त्यांच्या प्रलबिंत मागण्यांना ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. मात्र तब्बल २० दिवसानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने सर्व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायच्या चाव्या आणि शिक्के खंडविकास अधिकाऱ्यांकडे सोपविल्या.त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
ग्रामसेवकांनी त्यांच्या वेतनातील त्रृटी,पदोन्नती आणि रिक्त पदांच्या मागणीला घेऊन ९ आॅगस्टपासून राज्यभरात ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले.मात्र यानंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही.परिणामी ग्रामसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.शासन आंदोलनाची दखल न घेतल्याने २२ आॅगस्टपासून सर्व ग्रामसेवकांनी नाईलाजास्तव ग्रामपंचायतमधील अभिलेखाच्या चाव्या आणि शिक्के खंडविकास अधिकाºयांकडे जमा करुन आंदोलन अधिक तीव्र केले आहे.यामुळे ग्रामपंचायतची सर्वच कामे ठप्प पडली आहे.गावकºयांचा विविध कामासाठी ग्रामपंचायतशी संपर्क येतो.तसेच विविध दाखले, टॅक्स भरणे आदी कामासाठी ग्रामपंचायमध्ये जावे लागते. मात्र ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ही सर्व कामे खोळंबली असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.गावात विकासात्मक कामांची अंमलबजावणी करण्याचे काम ग्रामसेवक करीत असतात. मात्र त्यांच्या आंदोलनामुळे ही कामे सुध्दा रखडली आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात केव्हाही जाहीर होऊ शकते.त्यामुळे आचारसंहितेपूर्वी विकास कामांना मंजुरी, थकीत देयके मार्गी लावणे यासह अन्य कामे पूर्ण करुन घेणे गरजेचे आहे.
अन्यथा ही कामे अधिक लांबण्याची शक्यता असते. मागील २० दिवसांपासून ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू असून शासनाने त्याची कुठलीच दखल घेतली नसल्याने याचा फटका मात्र गावकºयांना सहन करावा लागत आहे.