भजियापार येथील स्मशानभूमीत गावकऱ्यांनी केले वृक्षारोपण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:39+5:302021-06-23T04:19:39+5:30
'माझं गाव-भजियापार गाव' या ग्रुपच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण झाली आणि गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्याचे निश्चित झाले. कामाची दोन ...
'माझं गाव-भजियापार गाव' या ग्रुपच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण झाली आणि गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्याचे निश्चित झाले. कामाची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात जेवढ्या भागात झाडे लावायची आहेत तेवढ्या भागात काटेरी कुंपण तयार करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात खड्डे खोदून झाडे लावणे व त्यांना प्लास्टिक कुंपण लावण्यात आले. एकूण ६० रोपटी लावून त्यांचे संवर्धन करण्यात आले. अंतिम संस्काराच्या वेळी झाडांची सावली उपलब्ध व्हावी यासाठी कडुनिंब, करंजी, गुलमोहर ही झाडे लावण्यात आली. यासाठी गौरीशंकर रहांगडाले, तेजलाल ठाकरे, तुकडूदास रहांगडाले, सुरेश रहांगडाले, विजय रहांगडाले, ब्रिजीलाल रहांगडाले, श्रीराम रहांगडाले, संतोष रहांगडाले, ओमप्रकाश बोपचे, सुनील रहांगडाले, प्रदीप रहांगडाले, मुनेश रहांगडाले, विजय रहांगडाले, गजेंद्र भेलावे, रवी रहांगडाले, जितेंद्र नान्हे, भूपेंद्र ठाकरे, रवी हरिणखेडे, चोपेश्वर लांजेवार, विशाल लांजेवार, लोकेश रहांगडाले यांनी सहकार्य केले.