रस्ता दुरुस्तीसाठी गावकऱ्यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 10:46 PM2019-09-19T22:46:46+5:302019-09-19T22:47:29+5:30
चिरेखनी गावात जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. मात्र सततच्या वर्दळीमुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणे गावकऱ्यांना कठीण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्यावरील खड्डयांमध्ये पाणी साचले असल्याने अनेकांचे अपघात होऊन दुखापत सुध्दा झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यात पाणी साचून गटारे तयार झाली आहेत. मात्र अद्यापही या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे येथील संतप्त गावकऱ्यांनी गुरूवारी रास्ता रोको आंदोलन करुन शासन आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
चिरेखनी गावात जाण्यासाठी एकच मुख्य रस्ता आहे. मात्र सततच्या वर्दळीमुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन ये-जा करणे गावकऱ्यांना कठीण झाले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्यावरील खड्डयांमध्ये पाणी साचले असल्याने अनेकांचे अपघात होऊन दुखापत सुध्दा झाली आहे. रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, यासाठी येथील गावकºयांनी अनेकदा पंचायत समिती,जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. जि.प.व पं.स.सदस्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली.मात्र त्यांनी सुध्दा याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी रस्त्याचा व्हिडिओ तयार करुन सोशल माध्यमावर टाकला.पण यानंतरही प्रशासनाला जाग न आल्याने चिरेखनी येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.जोपर्यंत हा रस्ता दुरूस्ती करणार नाही, तोपर्यंत हा रस्ता रहदारीसाठी सुरु करु देणार नाही अशी भूमिका गावकºयांनी घेतली आहे.