कोरोना चाचणी शिबिराला ग्रामस्थांचा प्रतिसाद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:30 AM2021-05-21T04:30:06+5:302021-05-21T04:30:06+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना (बाक्टी)च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बोदरा या लहानशा खेडेगावात कोरोना चाचणी शिबिर ...
प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना (बाक्टी)च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बोदरा या लहानशा खेडेगावात कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये आरटीपीसीआर तसेच रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या. कोरोना चाचणी शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वैद्यकीय अधिकारी श्वेता कुलकर्णी यांनी स्वत: ४८ जणांची आरटीपीसीआर टेस्ट घेतली. रॅट तपासणी तिघांची करण्यात आली. यामध्ये एक जण कोरोनाबाधित आढळून आला. ग्रामस्थांनी मनात कोणतीही भीती ठेवू नये. अशक्तपणा जाणवला तर लवकर चाचणी करावी. औषधोपचार झाल्यास कोरोनावर मात करता येते. सुरक्षित राहण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी समस्त नागरिकांनी पुढे यावे, असा हितोपदेश यावेळी डॉ. श्वेता कुलकर्णी यांनी केला. कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य सेवक साखरे, आरोग्य सेविका प्रतिभा राऊत, स्वाती लोहारे, रेखा कोसरे, भूमिता शहारे, सहायक शिक्षक लांडगे, रेखा सीखरामे यांनी सहकार्य केले.