ग्रामसभेच्या माध्यमातून गावे होताहेत सक्षम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:19 AM2021-06-29T04:19:56+5:302021-06-29T04:19:56+5:30
देवरी : तालुक्यातील आदिवासीबहुल गावांना अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित ...
देवरी : तालुक्यातील आदिवासीबहुल गावांना अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम २०,२१२ वनहक्क कायद्यान्वये विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था नागपूर यांच्या पुढाकाराने सामूहिक वनहक्कांचे दावे ग्रामसभाद्वारे तयार करून जवळपास ९० दावे जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडून मंजूर करण्यात आले. तर ३० गावांच्या वनसंवर्धनाचा आराखडा ग्रामसभेच्या माध्यमातून करण्यात आला.
सन २०१५ ते २०१७ या कालावधीत तालुक्यातील धमदिटोला, वासनी, पाउलझोला, कोसबी-बुज, मेहताखेडा, धवलखेडी, महाका, मोहाडी, सुंदरी, म्हैसुली, पिपरखारी, मिसपिर्री, कुणबीटोला, तुमडीकसा, कोटजंभुरा, फुटाना, मकरधोकडा, हरदोली, चारभाटा,पदमपूर, शिरपूरबांध, फुक्किमेटा, ढिवरनटोला, डवकी, ढोढरा, घोनाडी, पळसगाव चु., शेरपार, सुकळी या गावांचा सामूहिक वनहक्क गावांचा सर्वांगीण विकास करण्यात आला. विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेच्या कार्यक्षेत्रातील १९ गावातील १०७ तलावांची कामे अनेक योजनेतून व खासगी देणगी प्राप्त करून ३ कोटी २७ लाख रुपयांची कामे दिलीप गोडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. १९ गावातील १,२८७ हेक्टर आर मधील १,३६४ शेतकरी कुटुंबांना शेतीच्या सिंचनाकरिता फायदा झाला. तसेच मत्स्य व्यवसायालासुद्धा यामुळे हातभार लावण्यास मदत झाली. या माध्यमातून ग्रामसभांनासुद्धा दोन ते तीन लाख रुपयांचा नफा मिळाल्याची माहिती ग्रामसंभानी दिली. सामूहिक वनहक्क प्राप्त गावात विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने नीलक्रांती आली, असे सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक ए.एस. कळसकर यांनी या गावांना भेटी देऊन पाहणी केल्यानंतर सांगितले. यावेळी सी.डी. गोडे, शार्दुल गोडे, मोतीराम सयाम, नारायण सलामे, तेजराम मडावी, ब्रीजलाल राऊत, कीर्तनलाल सुरसावंत, तुलाराम उईके, जैराम केरामी, बिसराम मडावी, सुदाम भोयर लगून नेताम उपस्थित होते.