शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 08:34 PM2019-04-25T20:34:10+5:302019-04-25T20:36:21+5:30
शहरामध्ये वाहन चालकांकडून बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने सर्वसामान्य पादचाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरामध्ये वाहन चालकांकडून बेदरकारपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने सर्वसामान्य पादचाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चौकांमध्ये डोळयात धुळफेक करत असे प्रकार सर्रास सुरू असून वेगाने वाहच चालविण्यामुळे रस्त्यावरील सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलिसांनी अभियान राबवून भरधाव वाहनचालकांना आळा घालत वाहतुकीचे नियमाची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून हो लागली आहे.
दुचाकीवर दोनच जणांनी प्रवास करावा, असा नियम घालून देण्यात आला आहे. शिवाय शहरामध्ये दुचाकी चालविताना वेग नियंत्रित असणे गरजेचे आहे. मात्र चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची ऐसीतैसी केली जात आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसोबत वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. शाळेत जाणाऱ्या मिसरुडही न फुटलेल्या वाहनचालकांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे रस्त्याने चालणाऱ्यांना थोडा विचार करूनच पुढे जावे लागत आहे. वाहतूक शाखेकडून वेळोवेळी मोहीम राबवून तसेच चौकांमध्ये कर्तव्य बजावताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. तथापी, बरेचदा पोलिसांच्या कारवाईलाही न जुमानता हा प्रकार सर्रास सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक अडचणीत येतात. या प्रकारकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मोटारसायकलवर दोनच जणांनी प्रवास करावा, असा नियम घालून देण्यात आला आहे.
शिवाय शहरामध्ये मोटारसायकल चालविताना वेग नियंत्रित असणे गरजेचे अहे. मात्र दुचाकी चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची ऐसीतैशी होत असल्याचे दिसते. त्यामुळे पादचाऱ्यांसोबत वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.