महिला कर्मचाऱ्यांचा अभद्र व्यवहार
By admin | Published: February 3, 2017 01:39 AM2017-02-03T01:39:27+5:302017-02-03T01:39:27+5:30
बँक आॅफ इंडिया येथील कॅश कॅबिनमध्ये कार्यरत अलका नावाच्या कर्मचाऱ्याच्या अभद्र व्यवहारामुळे व्यापक असंतोष निर्माण झाला आहे.
आमगाव : बँक आॅफ इंडिया येथील कॅश कॅबिनमध्ये कार्यरत अलका नावाच्या कर्मचाऱ्याच्या अभद्र व्यवहारामुळे व्यापक असंतोष निर्माण झाला आहे. याबाबद शाखा व्यवस्थापकांना कल्पना असून ते दुर्लक्ष करीत असल्याने त्यांना त्वरित हटविण्याची मागणी अनेकांनी केली आहे.
सदर महिला कॅश कॅबिनमध्ळे ग्राहकांना रांगेत लावून काम करते. मात्र सदर महिला नगरातील श्रीमंत व गर्भश्रीमंत नागरिकांना बाजूच्या काऊंटरमधून व्यवहार करीत आहे. नियम हा सर्वांसाठी सारखाच असतो. गरीब असो वा श्रीमंत, त्यांनी पण रांगेत लावून आपले घेणे-देणे व्यवहार करणे गरजेचे आहे. मात्र निवडक लोकांना प्रथम प्राधान्य ही महिला देत आहे.
जो एखादा ग्राहक गरजू आहे. त्याला इतर ठिकाणी तातडीने जायचे आहे, त्यांना रांगेत न लावता बाजूच्या काऊंटरमधून पास बुक दिली तर त्याला फिरविण्याचे काम सदर अल्का नावाची महिला कर्मचारी सतत करीत आहे. या अगोदर येथील कार्यरत कर्मचाऱ्याची कामाची शैली व्यवस्थित होती. आता मात्र या नोटबंदीमुळे येथील कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांत व्यापक असंतोष निर्माण झाला असून या कर्मचाऱ्यांना तात्काळ हटविण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)