ग्रामपंचायत निवेदनाची दखल घेत नसल्याने युवकाची विरुगीरी; गोळा झालं गाव 

By अंकुश गुंडावार | Published: October 11, 2023 11:37 AM2023-10-11T11:37:53+5:302023-10-11T11:38:47+5:30

यामुळे गावात खळबळ उडाली आहे. 

Virugiri sholeystyle of the youth alleging that the Gram Panchayat did not take note of the statement | ग्रामपंचायत निवेदनाची दखल घेत नसल्याने युवकाची विरुगीरी; गोळा झालं गाव 

ग्रामपंचायत निवेदनाची दखल घेत नसल्याने युवकाची विरुगीरी; गोळा झालं गाव 

खातिया : ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनाची वेळीच दखल घेतली जात. गया ग्रामसेवक माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप करीत गोंदिया तालुक्यातील अर्जुनी येथील युवकाने बुधवारी सकाळी गावातील पाणीटाकीवर चढून विरुगिरी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आपल्या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत पाणीटाकीवरुन खाली उतरणार अशी भुमिका या युवकाने घेतली आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे. 

गोंदिया तालुक्यातील ग्राम अर्जुनी येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळील पाणीटाकीवर नरेन्द्र भीमराव गजभिये हा युवक बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चढला. शासन व अधिकारी हे आपण दिलेल्या निवेदनावर काही कारवाई करीत नाही. आपण वारंवार निवेदन देऊन थकलो असून जोपर्यंत आपल्या मागण्या होत नाही तोपर्यंत पाणी टाकीवरुन खाली उतरणार नाही अशी भुमिका या युवकाने घेतली आहे. अर्जुनी येथील ग्रामसेवक माहीतीच्या अधिकारांतर्गत माहीती देत नाही. तसेच जिल्हा परिषद शाळेत झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड ही नियमानुसार घेण्यात आली नसल्याचा आरोप या युवकाने केला आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस व प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले होते.

Web Title: Virugiri sholeystyle of the youth alleging that the Gram Panchayat did not take note of the statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.