समितीची भुसारीटोला गावाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:37 AM2018-06-17T00:37:02+5:302018-06-17T00:37:15+5:30

पार्वती बहुउद्देशिय विकास संस्था तसेच ग्रामपंचायत भुसारीटोलाच्यावतीने आदर्श गाव निवडीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीकडून .....

Visit the village of BhusariTola of the committee | समितीची भुसारीटोला गावाला भेट

समितीची भुसारीटोला गावाला भेट

Next
ठळक मुद्देआदर्श गाव समिती : गावाची पाहणी व गावकऱ्यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : पार्वती बहुउद्देशिय विकास संस्था तसेच ग्रामपंचायत भुसारीटोलाच्यावतीने आदर्श गाव निवडीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीकडून गुरूवारी (दि.१४) ग्राम भुसारीटोलाला भेट देऊन पाहणी करण्यात आली. या भेटीत समितीने गावकºयांशी संवाद साधूनही मुल्यांकन केले.
समितीने प्रथमत: शिवारफेरी करुन पाणलोट क्षेत्र, भातखाचर, मामा तलाव, वनराई बंधारे, नाला बांधकामाची पाहणी केली व गावफेरी करुन गावातील रस्ते, नाल्या, पाणी टाकी, वृक्षसंगोपन तसेच गावातील लोकांचा राहणीमान याची पाहणी करुन सविस्तर चौकशी केली. त्यानंतर गावातील ग्रामस्थांशी चर्चा करण्याकरीता व आदर्श गाव निवडीच्या मूल्यमापनाकरीता ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले.
या ग्राम सभेत आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या निदर्शनात कृषी उपसंचालक महादेव निंबाळकर यांनी प्रकल्पाविषयी मार्गदर्शन करुन गाव आदर्श कसे घडवायचे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. लोकांच्या गरजा व त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
तसेच प्रश्नउत्तराच्या स्वरुपात गावकºयांशी संवाद साधला. आदर्श गाव घडविण्यासाठी पार्वती बहुउद्देशिय विकास संस्थेची निवड करावी किंवा नाही. तसेच आदर्श गाव घडविण्यासाठी काय-काय करता येईल हे जाणून घेतले.
विशेष म्हणजे, गावात सप्तसूत्रीचे पालन कोणत्या माध्यमातून करता येईल जेणेकरुन आदर्श गाव घडविण्यास परिणामकारक होईल याची माहिती ग्रामस्थांकडून जाणून घेतली.
याप्रसंगी आदर्श गाव पुणेचे सुरेशचंद्र बारघडे, कृषी पर्यवेक्षक चंद्रकांत गौरे, कृषी सहायक संतोष डोळस, तालुका कृषी अधिकारी तुमडाम, लिलेश्वर रहांगडाले, सरपंच उमाकांत गहाणे, उपसरपंच भूमेश्वर वैद्य, ग्रा.पं.सदस्य, तंमुस सदस्य, महिला बचत गट, पुरुष बचत गट, युवक वर्ग, संस्थेचे प्रतिनिधी व समस्त गावकरी उपस्थित होते.

Web Title: Visit the village of BhusariTola of the committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.