पर्यटकांनो सावधान, अतिउत्साह येऊ शकतो अंगलट

By admin | Published: January 14, 2015 11:10 PM2015-01-14T23:10:14+5:302015-01-14T23:10:14+5:30

मकर संक्रातीचा सण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या सणाला पर्यटक आंघोळीसाठी पर्यटनस्थळी जाण्यास पहिली पसंती देतात. जिल्ह्यातील धरणे व प्रसिध्द हाजराफॉल

Visitors can be careful, over-the-counter | पर्यटकांनो सावधान, अतिउत्साह येऊ शकतो अंगलट

पर्यटकांनो सावधान, अतिउत्साह येऊ शकतो अंगलट

Next

आमगाव : मकर संक्रातीचा सण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या सणाला पर्यटक आंघोळीसाठी पर्यटनस्थळी जाण्यास पहिली पसंती देतात. जिल्ह्यातील धरणे व प्रसिध्द हाजराफॉल या ठिकाणी उत्साहाला उधान आलेले असते. परंतु या पर्यटनस्थळांवर अतिउत्साहामुळे आणि योग्य ती सावधगिरी न बाळगल्यामुळे अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला. यावेळीसुद्धा जीवावर संक्रांत येण्यापासून वाचण्यासाठी अशा पर्यटनस्थळी जाणाऱ्यांनी योग्य सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
मकरसंक्रात हा महिलांचा सण असला तरी या ठिवशी नदी, धरण किंवा सालेकसाजवळील हाजराफॉल या ठिकाणी जाण्यासाठी युवकांमध्ये अधिक प्रमाणात उत्साह संचारल्याचे चित्र असते. मकरसंक्रातीच्या लाड्ूंचा गोडवा पर्यटनस्थळी जाऊन वाढविण्याकडे त्यांचा कल असते. त्यामुळे अनेक कुटूंबे या पर्यटनस्थळावर आनंद लुटण्याकरिता भ्रमण करतात. जिल्ह्यातील कालीसराड, शिरपूर, पुजारीटोला, इटियाडोह व हाजराफॉल या पर्यटनस्थळावर संक्रांतीला गर्दी असते.
काही पर्यटक धरण परिसरात मासेमारी करण्यात येणाऱ्या नावावर बसून नौकाविहार करतात. परंतु अश्या प्रकारावर पूर्णत: बंदी आहे. परंतु अनेक व्यक्ती हौस पूर्ण करण्याकरिता आपला नाद सोडत नाहीत. त्यामुळे अपघाती मृत्यू ओढवतो. पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या व्यक्तींनी मकर संक्रातीचा उत्साह कायम ठेवत सावधगिरी बाळगल्यास या दिवशी होणाऱ्या अपघातांना निश्चित आळा घालणे शक्य होणार आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Visitors can be careful, over-the-counter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.