विठू माऊली तू ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2017 12:36 AM2017-07-05T00:36:12+5:302017-07-05T00:36:12+5:30
आषाढी एकादशीनिमित्ताने येथील विठूरायांच्या मंदिरात मंगळवारी (दि.४) भाविकांची एकच गर्दी दिसून येत होती.
विठूरायांच्या मंदिरात गर्दी : भजन-पूजनाचा कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आषाढी एकादशीनिमित्ताने येथील विठूरायांच्या मंदिरात मंगळवारी (दि.४) भाविकांची एकच गर्दी दिसून येत होती. मंदिरात भजन व पूजन सकाळ पासूनच सुरू असल्याने मंदिर परिसर भक्तीमय वातारणाने न्हाऊन निघाले होते.
राज्याचे आद्यदैवत विठूरायांची आषाढी एकादशी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरीची वारी करून विठू माऊलीच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करतात. त्यानुसार आषाढी एकादशी निमित्त येथील कृष्णपुरा वॉर्डातील विठूरायांच्या मंदिरात मंगळवारी (दि.४) सकाळपासूनच भाविकांनी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.
मंदिरात भजन मंडळाकडून विठू माऊलीचे भजन सुरू होते. तर भाविकांकडून विठू माऊलीचे पूजन करण्यात येत असल्याचे दिसून येत होते. आषाढी एकादशी निमित्त भविक उपवास ठेऊन विठूरायांची एकादशी साजरी करतात. यंदाही एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.