विक्तुबाबा दंडारीने लाखनीतही मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:24 PM2017-12-31T23:24:23+5:302017-12-31T23:24:46+5:30

दंडारीच्या माध्यमातून यशाची एक वर एक पायरी चढत जात असतानाच विक्तुबाबा दंडारने भंडारा जिल्ह्यातील ग्राम लाखनी येथे घेण्यात आलेल्या दंडार स्पर्धेतही बाजी मारली. विक्तुबाबा दंडारने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून रोख २१ हजार रूपयांचे पारितोषीक पटकाविले आहे.

Vittubaba Dandari has also killed millions | विक्तुबाबा दंडारीने लाखनीतही मारली बाजी

विक्तुबाबा दंडारीने लाखनीतही मारली बाजी

Next
ठळक मुद्दे प्रथम पुरस्कार पटकाविला : श्रोत्यांची मिळाली दाद

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : दंडारीच्या माध्यमातून यशाची एक वर एक पायरी चढत जात असतानाच विक्तुबाबा दंडारने भंडारा जिल्ह्यातील ग्राम लाखनी येथे घेण्यात आलेल्या दंडार स्पर्धेतही बाजी मारली. विक्तुबाबा दंडारने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून रोख २१ हजार रूपयांचे पारितोषीक पटकाविले आहे.
लाखनी येथील आठवडी बाजार समितीच्या परिसरात अनिल निर्वाण व राजेश निंबेकर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या दंडार स्पर्धेत भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील १३ दंडारींनी भाग घेतला होता. यात तालुक्यातील ग्राम भजेपार (वडेगाव) येथील विक्तुबाबा दंडार मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.
माजी खासदार नाना पटोले यांच्या हस्ते कव्वाल राहुल शिंदे, आमदार बाळा काशिवार, विठोबा कांबळे, डॉ. शफी लध्यानी, शेषराव वंजारी, अरिदास पडोळे, शुभम निर्वाण यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, शाल व श्रीफळ देवून मंडळा प्रमुख यु.एफ. टेंभरे यांचा सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेत मंडळाने लाखनी तालुका गौरवगाथा, गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त, मिला आज शेर के पंजे में, देशासाठी विरमरण सैनिक, देशभक्ती, बेटी बचाव-बेटी पढाओ, भ्रूण हत्या, साक्षरता, ग्रामस्वच्छता अभियान, मांडीला गोपालकाला यमुनातिरी या लावण्या व गीत सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात मुलीच्या वेषातील शालेय विद्यार्थी, बाल कलावंताचे विशेष आकर्षण होते. टिपरी नृत्य, गरबा व दंडार, लावणी, श्रीकृष्ण, पवनपूत्र हनुमान, श्रीरामचंद्र प्रभू यांची विशेष देखावा तयार करण्यात आली होता. या कार्यक्रमाने सर्व प्रेक्षक व पाहुणे मंत्रमुग्ध झाले होते.

Web Title: Vittubaba Dandari has also killed millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.