लेखाधिकाऱ्यांची स्वेच्छानिवृत्तीची मागणी

By admin | Published: July 9, 2017 12:11 AM2017-07-09T00:11:35+5:302017-07-09T00:11:35+5:30

नगर परिषदेत लेखाधिकारी व लेखा परीक्षक पदावर रूजू झाल्यानंतर वैद्यकीय रजेवर गेलेल्या लेखाधिकाऱ्यांनी आता थेट स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देऊन टाकला आहे.

Voluntary demand for accounting | लेखाधिकाऱ्यांची स्वेच्छानिवृत्तीची मागणी

लेखाधिकाऱ्यांची स्वेच्छानिवृत्तीची मागणी

Next

पालिका प्रशासनाला दिला अर्ज : काहीच दिवस राहिले कामावर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषदेत लेखाधिकारी व लेखा परीक्षक पदावर रूजू झाल्यानंतर वैद्यकीय रजेवर गेलेल्या लेखाधिकाऱ्यांनी आता थेट स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देऊन टाकला आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या लेखा विभागाचा कारभार प्रभारावरच चालणार आहे. स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिल्याने लेखाधिकाऱ्यांना गोंदिया नगर परिषद भावली नाही असेच म्हणावे लागणार आहे.
नगर विकास प्रशासनाने अवघ्या राज्यातच स्थानांतरणाची मोहीम राबवीली. यात गोंदिया नगर परिषदेतील राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बाहेर स्थानांतरण करण्यात आले. कर्मचारी गेले तेवढे कर्मचारी नगर परिषदेत रूजू झाले नाहीत. मात्र रूजू झालेले कर्मचारी सुट्या टाकून आता पळ काढू लागले असल्याचे प्रकार नगर परिषदेत दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणाने नगर परिषदेतील महत्वपूर्ण विभाग रिकामे झाले आहेत.
अशातच नगर परिषदेच्या लेखा विभागातील लेखाधिकारी प्रदीप अग्निहोत्री यांचे स्थानांतरण झाले. अगोदरच लेखापरिक्षकांचे पद रिकामे होते. त्यामुळे अग्निहोत्री यांच्या जागेवर आलेले सुधाकर काळे यांना लेखाधिकारी व लेखापरिक्षक अशी नियुक्ती देण्यात आली. माहितीनुसार, २ जून रोजी काळे येथे रूजू झालेत. आता त्यांना नगर परिषदेचे वातावरण भावले नाही क ी काय झाले, मात्र ७ जून पासून ते वैद्यकीय रजेवर गेले होते.
आता साहेबच सुट्टीवर गेले त्यामुळे विभागाचा कारभार विस्कळीत झाला. त्यामुळे रोखपाल दुबे यांच्याकडे सध्या लेखापरिक्षक व लिपीक जयप्रकाश भेंडारकर यांच्याकडे लेखाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आल्याची माहिती आहे. नगर परिषदेत अगोदरच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यात लेखाधिकारी सुट्टीवर गेल्याने लेखा विभागाचा कारभार विस्कळीत झाला होता. मात्र साहेब काही दिवसांनी येथील अशी आशा बाळगून विभागातीलच कर्मचाऱ्यांना प्रभार देऊन कामकाज चालविले जात होते.
आश्चर्याची बाब अशी की, ४ जुलै रोजी काळे नगर परिषदेत आले व यावेळी त्यांनी थेट स्वेच्छानिवृत्तीचाच अर्ज दिला असल्याची माहिती आहे. नरखेड येथून स्थानांतरण होऊन काळे येथे आले होते. मात्र त्यांना गोंदिया नगर परिषद भावली नसावी व त्यांनी थेट स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला असेच म्हणावे लागेल.
माहितीनुसार, काळे यांना निवृत्तीसाठी कालावधी आहे. मात्र आता त्यांच्या काही वैयक्तीक कारणांमुळेच त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा टोकाचा निर्णय घेतला असावा असेच म्हणता येईल.

विद्युत विभागही वाऱ्यावर
नगर परिषदेच्या विद्युत विभागातील अभियंता मारवाडे यांचे स्थानांतरण तिरोडा नगर परिषदेत करण्यात आले. मात्र अद्याप त्यांच्या जागेवर कुणीही आलेले नाही. परिणामी विद्युत विभागही वाऱ्यावरच दिसत आहे. विद्युत विभाग नगर परिषदेतील महत्वाचा विभाग आहे. आज या विभागात जबाबदार अधिकारी नसल्याने काही अडचण निर्माण झाल्यास मात्र पंचाईत होणार आहे. आता या विभागासाठी कधी अधिकारी येतात हे सांगणे ही कठीण आहे.

 

Web Title: Voluntary demand for accounting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.