मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण मोहीम आज

By admin | Published: June 21, 2015 01:05 AM2015-06-21T01:05:24+5:302015-06-21T01:05:24+5:30

निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे.

Voter lists purification and certification campaign today | मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण मोहीम आज

मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण मोहीम आज

Next

चुकांची दुरूस्ती : मृत, स्थानांतरित मतदार वगळणार
गोंदिया : निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणीकरण विशेष मोहीम २१ जून व १२ जुलै २०१५ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ यादरम्यान राबविण्यात येणार आहे.
मतदारांचे छायाचित्र, मतदार ओळखपत्रातील माहिती व युआयडीएआयची आधार कार्डामधील माहिती यांची सांगड घालणे, मतदार यादीतील दुबार, मयत तसेच स्थलांतरीत मतदारांची नावे वगळणे, छायाचित्र मतदार ओळखपत्रातील चुका दुरुस्त करुन प्रमाणित मतदार याद्या तयार करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५० च्या कलम १७, १८ व ३१ अन्वये एकापेक्षा अधिक ठिकाणी किंवा अधिक वेळा मतदार यादीत नावाची नोंद करणे हे अयोग्य असून ही बाब आपल्या विभागातील तसेच क्षेत्रीय आस्थापनेवरील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना अवगत करण्याच्या सूचना आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
सांगड घालण्यासाठी पर्याय
छायाचित्र मतदार ओळखपत्र व आधार क्रमांक यांची सांगड घालण्यासाठी पुढीलप्रमाणे पर्याय उपलब्ध आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. एसएमएस सुविधा ५१९६९ या क्रमांकावर उपलब्ध आहे. त्यासाठी मोबाईलवरुन आधार क्रमांक जोडता येणार असून त्यासाठी लिंक देण्यात आली आहे. या लिंकवर आपला तपशील नमूद करुन आधार क्रमांक जोडता येईल. विहित नमुन्यातील अर्जासोबत छायाचित्र मतदार ओळखपत्र व आधारकार्ड यांची प्रत मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावी.

Web Title: Voter lists purification and certification campaign today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.