तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरुद्ध मतदारांचा कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:46+5:302021-03-04T04:54:46+5:30
पुढे बोलताना बडोले यांनी, सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. तसेच विजयी झालेल्या ...
पुढे बोलताना बडोले यांनी, सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. तसेच विजयी झालेल्या उमेदवारांनी गटातटाचे राजकारण बंद करून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, असे सांगितले. मानकर यांनी, तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल करण्याचे काम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे, असे मत व्यक्त केले. पटले यांनी, बडोले पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. यामुळे आजही बडोले जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचा आदरभाव जनमानसात आहे, असे मत व्यक्त केले. पुराम यांनी सरपंचांनी सरपंचकी समजून घ्यावी व आपले अधिकार आणि कर्तव्य कळल्यास चांगले कार्य करता येईल, असे सांगितले. यावेळी ग्राम डव्वा येथील माजी संरपच चुन्नीलाल कोरे, शारदा किसान, शालिदर कापगते, रामलाल सय्याम, बेतनलाल बिसेन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष लंजे यांनी मांडले. संचालन महामंत्री शिशिर येळे यांनी केले. आभार युवा मोर्चा अध्यक्ष विलास बागळकर यांनी मानले.