मतदार हा लोकशाहीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:28 AM2019-01-28T00:28:11+5:302019-01-28T00:28:34+5:30

मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.

Voters are the basis of Democracy | मतदार हा लोकशाहीचा आधार

मतदार हा लोकशाहीचा आधार

googlenewsNext
ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. निवडणुकीमध्ये योग्य प्रतिनिधींना मताधिकाराचा योग्य वापर करु न निवडणे हा अधिकार मात्र मतदाराचा आहे. म्हणून प्रत्येक मतदाराला त्यांच्या मताधिकाराची जाणीव असणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे शुक्रवारी (दि.२५) आयोजित कार्यक्र मात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी जि.प.मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवडणूक उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपजिल्हाधिकारी रोहयो सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी भु-संपादन राहुल खांडेभराड, उपविभागीय अधिकारी देवरी रविंद्र राठोड, उपविभागीय अधिकारी तिरोडा गंगाधर तलपाळे, तहसीलदार राहुल सारंग, जिल्हा नियोजन अधिकारी मृणाली भूत, सहायक अधीक्षक राजेन्द्र पटले, लेखाधिकारी एल.एच.बाविस्कर उपस्थित होते.
बलकवडे म्हणाल्या, मतदारांच्या विविध शंका, प्रश्न, अडी-अडचणी मार्गी लावण्याकरीता १९५० हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. कार्यालयीन दिवशी कामकाजाच्या वेळेवर या क्र मांकावर फोन करु न मतदारांनी आपल्या समस्या सोडविण्याचे आवाहन केले. हा क्र मांक १९५० टोल फ्री असून बी.एस.एन.एल लँंडलाईन, बी.एस.एन.एल मोबाईल, आयडीया, व्होडाफोन या आपरेटर यांना निशुल्क करण्यात आला आहे. लवकरच इतर मोबाईलधारकांना ही सुविधा उपलब्ध करु न देण्यात येईल. मतदारांनी तहसील कार्यालय, बी.एल.ओ या संकेत स्थळावर भेट देऊन घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गोंदिया तालुक्यात प्रभात फेरी काढुन संदेश देण्यात आला. त्यांनतर इंदिरा गांधी स्टेडीयम येथे उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन, प्रश्नमंच, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध स्पर्धेत प्रथम, द्वीतीय व तृतीय क्र मांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमात सुभाष बहुउद्देशीय विकास संस्था चिखली या कलापथकाच्या माध्यमातून जागरुक मतदार नाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजन चौबे यांनी केले.

Web Title: Voters are the basis of Democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.