मतदार राजा झाला हुशार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 09:34 PM2019-04-01T21:34:55+5:302019-04-01T21:35:19+5:30

निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचणे शक्य नसते. परिणामी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचाराची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यावर दिली आहे़ यामुळे प्रत्येकजण जबाबदारीने जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. याचा नेमका फायदा मतदार घेत असून या धामधुमीत कार्यकर्त्याची फिरकी घेणाऱ्यांचे फुल मनोरंजन चौका चौकांत पहावयास मिळत आहे़

Voters became a master sharp | मतदार राजा झाला हुशार

मतदार राजा झाला हुशार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचणे शक्य नसते. परिणामी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचाराची जबाबदारी आपल्या कार्यकर्त्यावर दिली आहे़ यामुळे प्रत्येकजण जबाबदारीने जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. याचा नेमका फायदा मतदार घेत असून या धामधुमीत कार्यकर्त्याची फिरकी घेणाऱ्यांचे फुल मनोरंजन चौका चौकांत पहावयास मिळत आहे़
यात हुशारकी मारणारे कार्यकर्त्यावर तोंडसुख घेऊन पाच वर्षात एकदा आलेली संधी म्हणून यथेच्छ ताव मारणारे तरुणांबरोबर वृद्धही आपला टाईमपास करवून घेताना दिसत आहेत. यामुळे प्रचार करणारा कार्यकर्त्यापेक्षा मतदारराजा हुशार असल्याचे चित्र आहे. एकंदरीत यावेळी जागरूक मतदार सर्व अंदाज फोल ठरवतील, यात शंका नाही़ प्रचार कामात व्यस्त अनेकजण प्रचार करताना सरळ सरळ आमच्या पक्षाला मतदान करा म्हणून सांगतात आपण काही इतरापेक्षा वेगळे व मजबूत कार्यकर्ता म्हणून प्रचार करणारे हुशारकी मारत मतदाराचा अंदाज घेताना घुमून फिरून विचारतात़ ‘काय भाऊ, काका, काकी कसे काय सुरू आहे़’?आपला भाऊ काय म्हणतो, पोजिशन कशी आहे, माहोल बरोबर आहे की नाही, या घाईगर्दीत आपला उमेदवार प्रचंड मताने येणार सांगायला विसरत नाही़
याउलट आपण पुर्ण मताचा गठ्ठा पलटवला म्हणून सांगतो़ तेव्हा याउलट काही हुशार मतदारांचा कौल घेण्यासाठी मतदारांना सरळ विचारतो, कुणाला मतदान करून गा़ मतदार त्याला ओळखून असतो़ तु म्हणशील त्याला करून, लगेच त्याची छाती फुगते़ या फुगाफुगीत पटकन मजा घेणाऱ्याची प्रश्नांची सरबतीही सुरू होते़ मात्र काही विचारू नका तास दोन तास कसे निघून जातात कळतच नाही़ लगेच हातातील मोबाईलवर वेळ पाहून मजा घेणारे एक एक सरकतात व चर्चा संपली की व्यवस्थेला लागतात़
निवडणुका संपल्या की कोण नेता, कुठला कार्यकर्ता व कोण काय असा अनुभव मतदारांना आहे़ यात पक्ष सर्व एकसारखे असतात असा समज मतदाराचा झाला आहे़ यामुळे निवडणुकीच्या काळात गल्ली गल्ली फिरणाºया कार्यकर्त्यांना टारगेट करून त्यांची फिरकी घेणाºयाची संख्या जास्त आहे़ यात हुशारकी मारणाºया व समोर-समोर करणाºया कार्यकर्त्याची गोची करून टिंंगल उडवणाºयाचे गट ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.

Web Title: Voters became a master sharp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.