तालुक्यात लाखांवर मतदार

By admin | Published: June 18, 2015 12:48 AM2015-06-18T00:48:50+5:302015-06-18T00:48:50+5:30

येत्या ३० जून रोजी होऊ घातलेल्या तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ...

Voters in lakhs of talukas | तालुक्यात लाखांवर मतदार

तालुक्यात लाखांवर मतदार

Next

अर्जुनी-मोरगाव तालुका : ७ जि.प. तर १४ पं.स. क्षेत्र व १३२ मतदान केंद्रे
बोंडगावदेवी : येत्या ३० जून रोजी होऊ घातलेल्या तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकूण १३२ मतदान केंद्रांमधून ५३ हजार ३३३ पुरूष तर ५१ हजार २६३ महिला मतदार असे एक लाख चार हजार ५९६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तालुक्यात सात जिल्हा परिषद क्षेत्र व १४ पंचायत समिती क्षेत्र आहेत. तालुक्यातील गोठणगाव जि.प. क्षेत्रात आठ हजार २७९ पुरूष मतदार सात हजार ८३७ महिला मतदार असे एकूण १६ हजार ११६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवेगावबांध जि.प. क्षेत्रात सात हजार ६५० पुरूष, सात हजार ६२२ महिला असे एकूण १५ हजार २७२ मतदार, बोंडगावदेवी जि.प. क्षेत्रात सात हजार ६८५ पुरूष, सात हजार ६३१ महिला असे एकूण १५ हजार ३१६ मतदार, माहुरकुडा जि.प. क्षेत्रात सात हजार ३४४ पुरूष व सात हजार ०८६ महिला असे एकूण १४ हजार ४३० मतदार, इटखेडा जि.प. क्षेत्रात सात हजार ७६५ पुरूष व सात हजार ४१८ महिला असे एकूण १५ हजार १८० मतदार, महागाव जि.प. क्षेत्रात सात हजार ७३४ पुरूष व सात हजार २११ महिला असे एकूण १४ हजार ९४६ मतदार, केशोरी जि.प. क्षेत्रात सहा हजार ८७८ पुरूष व सहा हजार ४५८ महिला असे एकूण १३ हजार ३३६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तालुक्यातील झाशीनगर पंचायत समितीमध्ये चार हजार २७७ पुरूष व चार हजार ०५७ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोठणगाव पं.स.मध्ये चार हजार ००२ पुरूष व तीन हजार ७८० महिला मतदार, नवेगावबांध पं.स. क्षेत्रात तीन हजार ५८२ पुरूष व तीन हजार ५९७ महिला मतदार, भिवखिडकी पं.स. क्षेत्रात चार हजार ०६८ पुरूष व चार हजार ०२५ महिला मतदार, बोंडगावदेवी पं.स. क्षेत्रात तीन हजार ४६० पुरूष व तीन हजार ४८७ महिला मतदार, निमगाव पं.स. क्षेत्रात चार हजार २२५ पुरूष व चार हजार १४४ महिला मतदार, बाराभाटी पं.स. क्षेत्रात तीन हजार ६९३ पुरूष व तीन हजार ५३५ महिला मतदार, माहुरकुडा पं.स. क्षेत्रात तीन हजार ६५१ पुरूष व तीन हजार ५५१ महिला मतदार, ताडगाव पं.स. क्षेत्रात तीन हजार ७८९ पुरुष व तीन हजार ४९८ महिला मतदार, इटखेडा पं.स. क्षेत्रात तीन हजार ९७३ पुरूष व तीन हजार ९२० महिला मतदार, अरूणनगर पं.स. क्षेत्रात तीन हजार ८०२ पुरूष व तीन हजार ४७६ महिला मतदार, महागाव पं.स. क्षेत्रात तीन हजार ९३२ पुरूष व तीन हजार ७३५ महिला मतदार, केशोरी पं.स. क्षेत्रात तीन हजार २५० पुरूष तर तीन हजार ०६४ महिला मतदार, भरनोली पं.स. क्षेत्रात तीन हजार ६२८ पुरूष तर तीन हजार ३९४ महिला मतदारांचा समावेश आहे.
तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणासाठी एकूण १३२ मतदान केंद्रामधून ५३ हजार ३३३ पुरूष मतदार तर ५१ हजार २६३ महिला मतदार असे एकूण एक लाख चार हजार ५९६ मतदार येत्या ३० जून रोजी होऊ घातलेल्या जि.प. व पं.स. निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आता कोणत्या पक्षाची सरशी होते हे निवडणुकीनंतरच कळेल.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी एम.ए. राऊत तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार एच.आर. रहांगडाले व अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी जी.डी. कोरडे काम पाहत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Voters in lakhs of talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.