वडसा-कोहमारा रस्त्याची झाली दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:59 AM2018-08-25T00:59:03+5:302018-08-25T01:00:24+5:30
नेहमीच चर्चेत असलेल्या वडसा ते कोहमारा रस्त्यावर इसापूर पासून खामखुरा पर्यंत मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. सदर रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : नेहमीच चर्चेत असलेल्या वडसा ते कोहमारा रस्त्यावर इसापूर पासून खामखुरा पर्यंत मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. सदर रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसने केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी कोहमारा-वडसा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक असते. हा रस्ता अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील विकासाचा कणा आहे. तालुक्यातील गौरनगर, अरुणनगर, आसोलीटोला, कोरंभी, खामखुरा, इसापूर, इटखेडा, अर्जुनी, बाराभाटी, नवेगावबांध व परसोडी इत्यादी गावे एकमेकांना जोडली गेली आहे. या रस्त्याने शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार व व्यवसायीकांना वाहतूक करावी लागते.
मात्र या रस्त्यावर इसापूरपासून ते खामखुरा या गावापर्यंत मोठमोठे खड्डे पडल्यामुळे लोकांचा प्रवास कठिण होऊन अपघात घडत आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाच इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष निपल बरैया यांनी दिला आहे.