संजयकुटीची वाट झाली खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:28 AM2021-03-26T04:28:26+5:302021-03-26T04:28:26+5:30
नवेगाव राष्ट्रीय उद्यानात संजयकुटी तलावाच्या किनाऱ्यावर असून, येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. संजयकुटी रस्त्यावर दक्षिण दिशेला आठ कोटी ...
नवेगाव राष्ट्रीय उद्यानात संजयकुटी तलावाच्या किनाऱ्यावर असून, येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. संजयकुटी रस्त्यावर दक्षिण दिशेला आठ कोटी रुपये खर्च करून रिसोर्ट पाच वर्षांपासून तयार होत आहेत. अंदाजपत्रकाप्रमाणे असून, सुद्धा कंत्राटदाराने कामपूर्ण न करता सन २०१८ मध्ये पाच कोटी रुपये तत्कालीनमंत्री राजकुमार बडोले यांच्या विकास निधीतून मंजूर करून घेतले होते, पण आजघडीला त्या रिसोर्टच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा व भ्रष्टाचार करण्यासाठीच ही योजना राबविली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. विशेष म्हणजे, पूर्वीच वन्यजीव विभागाचे अनेक गेस्टहाउस असून, ते रिकामे पडले असतात. वन्यजीव विभागाच्या रेस्टहाउसचे ५००-१००० रुपये भाडे देण्यास पर्यटक तयार नाही. एकीकडे १३ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेले रिसोर्टचे रोजचे भाडे पाच हजार रुपये असे राहणार आहे, तर ते दर पर्यटकांना कसे परवडणार.