१०८ रुग्णवाहिकेसाठीही वेटिंग; दररोज ५० कॉल्स ! (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:28+5:302021-04-20T04:30:28+5:30
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने १०८ रुग्णवाहिकेची मागणी झपाट्याने वाढली आहे. तरीही २० मिनिटे ते अर्ध्या तासात ही ...
गोंदिया : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने १०८ रुग्णवाहिकेची मागणी झपाट्याने वाढली आहे. तरीही २० मिनिटे ते अर्ध्या तासात ही रुग्णवाहिका मागणी करणाऱ्यांच्या दारात पोहचते. कधी कधी मागणी जास्त होत असल्याने अनेकांना वेटिंगवर राहावे लागते. गोंदिया जिल्ह्यात १०८ च्या एकूण १५ रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी ८ रुग्णवाहिका कोविड कामात लावण्यात आल्या आहेत. तर ७ रुग्णवाहिका इतर रुग्णांसाठी लावण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने प्रत्येक कोविड सेंटरकरिता प्रत्येकी एक रुग्णवाहिका खासगी, तर प्रत्येक तालुक्याला आणखी एक खासगी रुग्णवाहिका देण्यात आली आहे. कोविडचा संसर्ग पाहता ही व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात १०८ रुग्णवाहिकेसाठी शहरातील ६० टक्के लोकांचा फोन येतो. तर ग्रामीण भागातील ४० टक्के फोन येतात. दिवसाकाठी ७५ च्या घरात १०८ रुग्णवाहिकेसाठी फोन येत आहेत, असे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसच्या समन्वयक स्वाती पाटील यांनी सांगितले आहे.
.......
जिल्ह्यात एकूण १०८ रुग्णावाहिका-१५
दररोज येणारे कॉल-७५
शहरातून येणारे कॉल-४५
......
कोणत्या महिन्यात किती रुग्णांची वाहतूक
जानेवारी- कोरोनाचे ४६- इतर रुग्ण १८३२
फेब्रुवारी- कोरोनाचे ७- इतर रुग्ण २२४६
मार्च- कोरोनाचे ५७- इतर रुग्ण २१८१
........
कॉल केल्यानंतर अर्ध्या तासात रुग्णवाहिका हजर
१) एखाद्या व्यक्तीने १०८ रुग्णवाहिकेसाठी फोन केल्यास त्यांना तत्काळ रिस्पॉन्स दिला जातो. परंतु कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने कधी कधी तासभर तर कधी अर्धा तास प्रतीक्षा करावी लागते.
२) परिस्थिती कशी आहे, रुग्ण जास्त असले आणि एकाच वेळी रुग्णवाहिकांची मागणी वाढली तर रुग्णवाहिका मागणीच्या स्थळी पोहचायला उशीर होते. परिणामी चालकांना अनेकदा लोकांच्या रोषाला सामोरेदेखील जावे लागते.
३) कधी कधी तर २० मिनिटाच्या आतच रुग्णवाहिका रुग्णाच्या जवळ पोहचते तर कधी उशीर लागतो. कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी लावलेल्या रुग्णवाहिका उशिरा पोहचत आहेत.
.........
शहरी भागातून १०८ रुग्णवाहिकेला अधिक मागणी
कोविडच्या काळात १०८ रुग्णवाहिकेला अधिक मागणी शहरी भागातून आहे. शहरात ताप आला की कोविड असावा असा संशय व्यक्त करून रुग्णवाहिका बोलावली जाते. परंतु ग्रामीण भागात ताप आला की घरातीलच लोक मोटारसायकलवर डॉक्टरांकडे घेऊन जातात त्यानंतर रुग्णवाहिकेला बोलावतात.