१७ वर्षांपासून डॉक्टरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:10 AM2017-11-01T00:10:33+5:302017-11-01T00:10:54+5:30

गोठणगाव येथे श्रेणी २ चा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला. मात्र गेल्या १७ वर्षांपासून येथे पशु वैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने हा दवाखाना केवळ नाममात्र ठरत आहे.

Waiting for a doctor for 17 years | १७ वर्षांपासून डॉक्टरची प्रतीक्षा

१७ वर्षांपासून डॉक्टरची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देपशुवैद्यकीय दवाखाना वाºयावर : पशुपालकांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्क
गोठणगाव : गोठणगाव येथे श्रेणी २ चा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला. मात्र गेल्या १७ वर्षांपासून येथे पशु वैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने हा दवाखाना केवळ नाममात्र ठरत आहे.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव परिसरात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. बरेचदा जनावरांना साथीच्या आजारांची लागण होते. तेव्हा ते जनावरांना उपचारासाठी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेतात. मात्र येथे पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
मागील १७ वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने त्यांना जनावरांवर वेळीच उपचार करणे शक्य होत नाही. यामुळे बरेचदा जनावरांचा बळी सुध्दा गेल्याची माहिती आहे. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जून २००१ पूर्वी डॉ.दुसावार कार्यरत होते. त्यांची दुसºया ठिकाणी बदली झाली. तेव्हापासून येथे दुसºया पशुवैद्यकीय अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली नाही. येथील दवाखान्याचा प्रभार दुसºया डॉक्टरकडे सोपविण्यात आला. मात्र ते सुध्दा या दवाखान्याकडे भटकत नसल्याने पशुपालकांना जनावरांवर वेळीच उपचार करणे शक्य होत नाही. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात एक डॉक्टर आणि परिचर असे दोन पदे मंजूर आहे. मात्र डॉक्टरचे पद रिक्त तर परिचर सुध्दा अर्जुनी मोरगाव येथे कार्यरत असल्याची माहिती आहे. मागील १७ वर्षांपासून रिक्त असलेले डॉक्टरचे पद भरण्याची मागणी गावकºयांनी अनेकदा जिल्हा परिषद व तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले आहे. दरवर्षी जनावरांना साथ रोगांची लागण होत असते. यावर्षी सुध्दा जनावरांना तोंडखुरी या आजाराची लागण झाली होती. यामुळे काही शेतकºयांच्या शेळ्या देखील या आजाराने दगावल्याची माहिती आहे. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरचे पद रिक्त असल्याने बोंडगाव, गंधारी, जांभळी, सुरबन, कढोली व प्रतापगड भागातील पशुपालकांना अर्जुनी/मोरगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना घेवून जावे लागते.
इमारतीची दुरवस्था
येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीची सुद्धा दुरवस्था झाली आहे. ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. दवाखान्याचे समोरील प्रवेशव्दाराचे लोखंडी गेट गायब आहे. परिसरात गवत वाढलेले आहे. बोअरवेल नादुरुस्त आहे. तर परिसरात झाडेझुडपे वाढलेली आहेत. दवाखाना सुरू असल्याचे दाखविण्यासाठी खोटे रेर्काड भरुन पाठविले जात असल्याचा आरोप गावकºयांचा आहे.
जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
पशुपालकांना त्यांच्या जनावरांवर वेळीच औषध उपचार करता यावे. यासाठी येथे पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला. मात्र गेल्या १७ वर्षांपासून रिक्त असलेले पशुवैद्यकीय अधिकाºयाचे पद भरण्याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा दवाखाना केवळ नावापुरताच ठरत आहे. दरम्यान येथील रिक्त असलेले डॉक्टरचे पद त्वरित न भरल्यास या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे.

Web Title: Waiting for a doctor for 17 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.