अधिकाऱ्यांची ९२ पदे भरण्याची प्रतीक्षा

By admin | Published: May 8, 2017 12:55 AM2017-05-08T00:55:38+5:302017-05-08T00:55:38+5:30

जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शेकडो पद रिक्त आहेत.

Waiting to fill 98 posts of the officers | अधिकाऱ्यांची ९२ पदे भरण्याची प्रतीक्षा

अधिकाऱ्यांची ९२ पदे भरण्याची प्रतीक्षा

Next

प्रथम व द्वितीय श्रेणीची ६१ पदे रिक्त: मिनी मंत्रालयातील कामकाज संथगतीने
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शेकडो पद रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या महत्त्वपूर्ण विभागात प्रथम व द्वितीय श्रेणीचे ९२ पद रिक्त असल्यामुळे अनेक फाईल अडकल्या आहेत.
जिल्हा परिषदेत प्रथम श्रेणीच्या १६६ पदांपैकीे ६१ पद रिक्त आहेत. यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, वरिष्ठ लेखा अधिकारी (जिग्रावियं),सहायक प्रकल्प अधिकारी (पशुसं/कृषी) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची ची दोन पदे, उपअभियंता (जिग्रावियं), उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मनरेगा), समाज कल्याण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ ची २० पदे, उपकार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, उपअभियंता (यांत्रिकी), उपअभियंता (जि.प. बांधकाम) ३ पदे, पशुधन विकास अधिकाऱ्यांची २२ पदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, ३ तालुका वैद्यकीय अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अशी वर्ग १ ची ६१ पदे रिक्त आहेत. तर द्वितीय श्रेणीत १०६ पैकी ३१ पदे रिक्त आहेत.
यात जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य),जिल्हा कृषी अधिकारी (विशेष घटक योजना), मोहिम अधिकारी (कृषी), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), लेखा अधिकारी (शालेय पोषण आहार), गटशिक्षणाधिकाऱ्यांची ३ पदे , बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची ८ पदे, अधीक्षक (शालेय पोषण आहार) ची ५ पदे, लेखाधिकारी (जिग्रावियं) २ पदे, वैद्यकीय अधिकारी ‘ब’ गटाची ६ पदे, वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षण केंद, कृषी अधिकारी (नरेगा) अशी ३१ पदे रिक्त आहेत. कृषी अधिकारी नरेगा हे पद पदनिर्मितीपासून रिक्तच आहे. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत सार्वत्रिक बदल्या होणार असल्याने आणखी अधिकाऱ्यांची रिक्त पदे होण्याची शक्यता आहे.
गोंदियात येण्यासाठी अधिकारी उत्सूकता दाखवित नाही. जि.प. च्या महत्वपूर्ण विभागात प्रमुख अधिकारी नसल्यामुळे अनेक फाईलवर निर्णय होऊ शकले नाही. त्यामुळे शेकडो फाईल अडकलेल्या आहेत. एक दिवसात होणारे काम आठवडाभरात होते.

बिनधास्त कर्मचारी
जि.प. मध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागपूरचे आकर्षण आहे. येथील अधिकारी व कर्मचारी बिनधास्त असून ते नागपूरवरून ये-जा करतात व गोंदियात वास्तव्य असल्याचे दाखवून घरभाडे भत्ता घेतात. गोंदियात कुणी अधिकारी यायला तयार नाही. त्यामुळे प्रमुख विभागातील अधिकारी नसून या विभागात काम करणारे कर्मचारी आपल्या मनमर्जीने वागतात. अनेक कर्मचारी नागपूर, भंडारा, तुमसर व तिरोडा येथून दररोज ये-जा करतात. दुपारी ३ वाजता नंतर जि.प. च्या बहुतांश विभागात स्मशान शांतता असते.
पोषण आहार संकटात
जि.प.मध्ये द्वितीय श्रेणीचे शालेय पोषण आहार संबंधित अधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्यामुळे शालेय पोषण आहार योजनेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार संबंधित तक्रारी वाढत आहेत. विभागात लेखा अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. अधीक्षकांचे सात पैकी ६ पद रिक्त आहेत. फक्त एका अधीक्षकाच्या भरवशावर पोषण आहार चे कामकाज चालते.
बालकांचा विकास खुंटतोय
जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) व द्वितीय श्रेणी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे ९ पैकी ८ पद रिक्त आहेत. त्यामुळे या विभागाचे कामकाज ठप्प आहे. एक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या भरवशावर कामकाज चालत आहेत.

Web Title: Waiting to fill 98 posts of the officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.