रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:37 AM2021-04-30T04:37:37+5:302021-04-30T04:37:37+5:30
शहरात कीटकनाशक फवारणीची मागणी सालेकसा : वातावरण बदलामुळे मोठ्या प्रमाणात डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या डास ...
शहरात कीटकनाशक फवारणीची मागणी
सालेकसा : वातावरण बदलामुळे मोठ्या प्रमाणात डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या डास व कीटकांपासून संसर्गजन्य आजार फोफावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एटीएम होताहेत कोरोना संसर्गाचे केंद्र
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बँका तसेच एटीएम केंद्रावर सॅनिटायझर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, या निर्देशांचे पालन केले जात नाही.
झाडे जगवा उपक्रम कागदोपत्री
पांढरी : ‘झाडे लावा-झाडे जगवा’ उपक्रम राबवून कंत्राटदाराने झाडांची लागवड केली; परंतु त्यांची जोपासना न केल्याने कित्येक झाडे वाळली असून उर्वरित मरण्याच्या अवस्थेत आहेत.
रानडुकरांनी केले धानपिकाचे नुकसान
गोठणगाव : अर्जुनी-मोरगाव तालुक्यांंतर्गत साझा क्रमांक-२६ मध्ये रानडुकरांनी हैदोस मांडला असून त्यामुळे धान पीक जमीनदोस्त झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना रानडुकर मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
डिझेलच्या दरवाढीने शेतकऱ्यांची चिंतेत वाढ
केशोरी : केंद्र सरकारने डिझेलचे भाव वाढविल्यामुळे सर्व क्षेत्रांसह शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये धान पिकासह इतरही पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी वर्षभर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करतात. शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारे महत्त्वाचे साधन म्हणजे ट्रॅक्टर होय; पण आता महागाईमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
प्रवासी निवाऱ्यांची मागणी
मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील नवेझरी या गावी प्रवासी निवारागृह होते; पण जीर्ण होऊन जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी प्रवासी निवारागृह असणे फार गरजेचे आहे. नवेझरी गावासाठी ही बाब फार खेदाची आहे. नवेझरी या गावी छोटीसी बाजारपेठ आहे. दर शुक्रवारी आठवडी बाजार भरत असतो. गांगला परिसरातील १० ते १५ खेडे गावांचा समावेश येत असतो. या गावी दिवसभर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते. प्रवासी निवाऱ्याची मागणी होत आहे.
बनगाव येथे घाणीचे साम्राज्य
आमगाव : बनगाव येथील वाॅर्ड क्रमांक-६ मधील नहर रोड, अनिहानगर व कामठा रोड परिसरात कचरापेटी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे.
अनुदानाचे वाटप करण्याची मागणी
गोंदिया : गेल्या ६-७ महिन्यांपासून वयोवृद्ध निराधारांंना अद्यापही बँक खात्यात अनुदान जमा न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनुदान जमा करण्याची मागणी आहे.
लाभापासून कर्मचारी वंचित
सडक-अर्जुनी : शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून वर्षभराचा कालावधी झाला; परंतु वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही लाभ देण्यात आला नाही.
हॉर्नमुळे शहरातील नागरिक त्रस्त
गोंदिया : शहराच्या आतील भागातून मोठ्या प्रमाणात जड वाहनांचे आवागमन होत असून त्यांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे नागरिकांना त्रास होत आहे. अशांवर कारवाईची गरज आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहतूक ठप्प
गोरेगाव : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.