रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:57+5:302021-07-26T04:26:57+5:30

कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा नवेगावबांध : कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच ...

Waiting for the flyover at the railway station | रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा

रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा

Next

कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

नवेगावबांध : कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत करण्याची मागणी खराशी व परिसरातील बांधकाम कामगारांनी केली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत इमारत व इतर बांधकामे बंद झाली होती. परिणामी, बांधकाम कामगारांना रोजगार मिळेनासा झाला.

शिपाईपद भरतीची वयोमर्यादा वाढवा

आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरतीप्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार असून, ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वरून ३५ वर्षे करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांनी केली आहे.

वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष

सडक-अर्जुनी : वनसंपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यातील वनांमध्ये मोठ्या प्रमाणात वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट असल्याचे दिसून येते. वनविभागाचे वनांकडे दुर्लक्ष असल्याची वनतस्करांनी संधी साधून जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा लावला आहे.

कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची मागणी

सडक-अर्जुनी : मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.- ६वर कोहमारा गाव आहे. मात्र, कोहमारा येथे प्रवासी निवाऱ्याची कुठलीही सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा

गोरेगाव : शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून, त्यावर खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात त्यामुळे नागरिकांना रहदारीला फारच त्रास होतो. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

वातावरणातील बदलामुळे भीती

तिरोडा : वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखी यांसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

बाजारातील रस्ते मोकळे करा

गोंदिया : बाजारपेठेतील रस्ते अगोदरच अरुंद आहेत. त्यातही दुकानदार त्यांच्या दुकानातील सामान व बोर्ड रस्त्यावर आणून ठेवतात. नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यासाठी अडचण होते.

रस्त्यावरील झुडपे अपघाताला कारणीभूत

अर्जुनी-मोरगाव : राज्यमार्गालगत वाढलेली झुडपे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वळणाच्या ठिकाणी असलेल्या या झुडुपांमुळे वाहन दिसत नाही. झुडपे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.

मोकाट जनावरांचा मुख्य रस्त्यावर बैठा सत्याग्रह

बोंडगावदेवी : तालुक्याचे मुख्य ठिकाण, व्यापार नगरी असलेल्या अर्जुनी मोरगाव शहराच्या रहदारीच्या मार्गावर सद्य:स्थितीत मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. मात्र, याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अर्जुनी मोरगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने लोकांची सतत वर्दळ असते.

बेरोजगारांच्या हाताला काम द्या

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून, स्थानिक युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र, धानावर आधारित उद्योग नसल्याने युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बेरोजगारांना काम मिळवून देण्याची मागणी केली जात आहे.

बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी

केशोरी : येथील बसस्थानक परिसरातील जागेत खासगी व्यावसायिकांनी दुकाने थाटून शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे परिवहन मंडळाची बस परत फिरविण्यासाठी जागा राहत नसल्याने बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी होत आहे. येथील ग्रामपंचायत प्रशासन दुकानदारांचे हित जोपासून अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.

अर्धवट बांधकामाचा बसतोय फटका

गोरेगाव : गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर फाटक नसलेल्या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच अपुऱ्या मनुष्यबळाअभावी रेल्वेमार्गावर फाटक उभारण्यास अडचणी निर्माण होत असल्याने रेल्वे विभागाकडून मागील १० ते १५ वर्षांपासून अनेक रेल्वे मार्गांवर बोगद्यांचे काम सुरू आहे; पण हे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

व्यायामशाळा उभारण्याची मागणी

सालेकसा : तालुक्यातील काही गावात व्यायामशाळा नसल्याने युवकांची अडचण होत आहे. स्वस्थ शरीरासाठी व्यायाम महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Waiting for the flyover at the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.