दीड हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 09:17 PM2019-06-08T21:17:08+5:302019-06-08T21:17:58+5:30

मागील दोन दशकापाूसन उपेक्षित असलेला बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आणि कालवे, पाण्याच्या वितरीका पूर्ण झाल्यानंतर दरेकसा परिसरातील जवळपास दीड हजार हेक्टर शेती सुजलाम सुफलाम होईल. १५ गावातील शेतकऱ्यांना याची मदत होवू शकते.

Waiting for irrigation for one and a half thousand hectare area | दीड हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची प्रतीक्षा

दीड हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । १५ गावातील शेतकऱ्यांना होणार मदत । दोन्ही हंगामातील पिकांना मिळू शकेल पाणी

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : मागील दोन दशकापाूसन उपेक्षित असलेला बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आणि कालवे, पाण्याच्या वितरीका पूर्ण झाल्यानंतर दरेकसा परिसरातील जवळपास दीड हजार हेक्टर शेती सुजलाम सुफलाम होईल. १५ गावातील शेतकऱ्यांना याची मदत होवू शकते.परंतु प्रकल्पाचे काम अर्धवट पडून असल्याने मागील अनेक वर्षापासून या परिसरातील शेती वरथेंबी पावसावरच अवलंबून असून सिंचनाच्या सोयीची प्रतीक्षा करीत आहे.
बेवारटोला धरणाचा जलाशय साठा ७.९६८८ दशलक्ष घनमिटर आहे. मृत साठा ०.७२४८ दशलक्ष घनमिटर आहे. या धरणाची लांबी ९८० मिटर आहे. धरणाची महत्तम उंची १९.३० मिटर एवढी राहणार आहे. या धरणामध्ये एकूण पाण्याचा येवा १६.२२१ दशलक्ष घनमिटर पेक्षा जास्त असून धरणाच्या क्षमतेपेक्षा दुप्पटच्यावर राहणार आहे. प्रकल्पाची सिंचन क्षमता १७४२ हेक्टर असून या धरणातील दोन्ही कालव्यातून १३७९ हेक्टर शेतीला थेट लाभ मिळेल. तसेच या प्रकल्पांतर्गत २३१५ हेक्टर क्षेत्राचा लाभ क्षेत्रामध्ये समावेश असेल. बेवारटोला प्रकल्पासाठी ४९.६०२ हेक्टर वनजमिन आणि १४४.६४ हेक्टर खासगी जमिन अधिगृहीत करण्यात आली होती. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या या धरणामध्ये छत्तीसगड राज्यातील नदी नाल्यांचा पाणी आणि या भागात मोठमोठे पर्वत रांग असल्याने त्यावरुन पडणारे पाणी सुद्धा वर्षभर संग्रहीत होते. त्यामुळे या धरणाच्या पाण्यामुळे शेतीला भरपूर सिंचन सोय होऊ शकतो. ऐवढेच नाही तर खरीप आणि रबी हंगामालाही भरपूर पाणी मिळू शकतो. एखाद्या वर्षी पर्जन्यमान कमी असला तरी या धरणात पाण्याचा साठा कमी पडणार नाही. दरवर्षी उन्हाळी धानपिकासह रबी हंगामातील इतर पिके सुद्धा घेतल्यास पाण्याची कमी भासणार नाही.
या भागाची शेती सुद्धा ऐवढी सुपीक आहे की या जमिनीला सिंचनाची सोय झाल्यास कोणतीही पीक घेता येऊ शकते. अशात या भागाचा शेतकरी नफ्याची शेती करण्यासाठी नगदी पिके घेऊ शकतात. या भागात गरीब आदिवासी शेतकरी मोठ्या आशेवर आहेत.
पुढाकार घेण्याची गरज
बेवारटोला प्रकल्प आणि त्याचे कालवे अपूर्ण असून मागील दोन दशकापासून या क्षेत्रातील शेतकरी प्रकल्प पूर्ण होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. याचा मुख्य कारण म्हणजे या भागातील शेतकºयांच्या नेतृत्व करीत पुढाकार घेणाºया कणखर व्यक्तीची नेहमी कमतरता राहीली. काही स्थानिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या प्रकल्पाची समस्या उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना आपला प्रस्ताव यशस्वीपणे मांडता आला नाही. बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास दरेकसा परिसरातील मुख्य आठ गावासह जवळपास १५ गावातील ५०० ते ६०० शेतकरी समृद्ध शेती करेतील. यात टोयागोंदी, चांदसूरज, विचारपूर, ठूबरुटोला, कोपालगड, दल्लीटोला, जमाकुडो, पठाणटोला, तेलीटोला, बंजारी, डहाराटोला, भर्रीटोला, धनेगाव, दलदलकुही व इतर छोट्या गावांना लाभ मिळू शकतो.

बेवारटोला प्रकल्प पूर्ण झाल्यास आदिवासी गरीब शेतकऱ्यांच्या शेतात पाणी मिळून या भागातील शेतकरी व शेतमजूर प्रगतीच्या वाटेवर येऊ शकतात. शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे.
- शंकरलाल मडावी
आदिवासी सेवक दरेकसा

Web Title: Waiting for irrigation for one and a half thousand hectare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.